महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी अडीच वर्षे थांबावे लागेल, भुजबळांचा Fadnavis यांना टोला

'गोवा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है', असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या या निर्धारातील राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हवा काढून टाकली आहे.

महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी अडीच वर्षे थांबावे लागेल, भुजबळांचा Fadnavis यांना टोला
प्रत्येकाला धान्य मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करणार: छगन भुजबळImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 1:06 PM

नाशिक: ‘गोवा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’, असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला आहे. फडणवीसांच्या या निर्धारातील राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हवा काढून टाकली आहे. महाराष्ट्रात (maharashtra) सत्ता येण्यासाठी फडणवीसांना अडीच वर्षे थांबावे लागेल, असा टोला छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे 50 आमदार कमी झाले. विरोधक जर एकत्र होऊन लढले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं. यावरून भाजपची लाट कमी होताना दिसत आहे, असं सांगतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचे लोक कसे निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी टीव्ही 9 मराठी नंबर वन ठरल्याबद्दल टीव्ही9च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतानाच टीव्ही9 मराठीच्या बातमीदारीचं त्यांनी कौतुकही केलं.

छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं. ओबीसी आरक्षणा संदर्भात बांठीया कमिशन नेमले आहे. आरक्षणाबाबत काम देखील सुरू झाले आहे. हा आयोग येत्या दोन महिन्यात त्यांचं काम पूर्ण करेल अशी अपेक्षा आहेत. राज्य सरकार प्रभाग रचना तयार करून निवडणूक आयोगाला देणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक ठरवावी, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाशकातील कोरोना निर्बंधाबाबत आज बैठक घेऊन त्यात निर्णय घेतला जाणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत राज्यपालांकडे विनंती पत्र पाठविले आहे. लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षाची निवड करावी, असे आदेश राज्यपालांनी दिले होते. त्यामुळे आात राज्यपालच याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा. हायकोर्टाने देखील तशा सूचना दिल्या आहेत, असंही ते म्हणाले.

भुजबळांकडून टीव्ही9चं अभिनंदन

बार्कच्या रेटिंगमध्ये टीव्ही 9 मराठी नंबर वन चॅनेल ठरलं आहे. त्याबद्दल भुजबळ यांनी टीव्ही9च्या टीमचं अभिनंदन केलं. टीव्ही9च्या संपादकापासून पत्रकारांनी ग्राऊंडवर जाऊन काम केलं. कष्ट करून जनतेसमोर माहिती देण्याचं काम केलं. शेतकरी, कष्टकरी, राज्यात सुरू असलेली राजकीय भांडणं, देशात सुरू असलेल्या घटना, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, बेरोजगारी, समस्या असतील या गोष्टी टीव्ही9ने प्रखरपणे मांडल्या. यामुळे tv9 लोकांमध्ये चांगलं प्रसिद्ध झालं आहे. लोकांना हे चॅनल आवडत आहे म्हणून tv9 पहिल्या नंबरला आलं आहे. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

Rane पिता-पुत्रांचा राजकीय इन्श्युरन्स संपलाय, विनायक राऊतांची खोचक टीका

चोरीचे Aadhaar Card वापरून बँक खाते ओपन करता येऊ शकते ? याचा तुम्हाला किती फटका बसू शकतो जाणून घ्या

Chandrapur Crime | मुलाचा राग काढला बापावर, कुऱ्हाडीने पाडला मुडदा, न्यायालयाने सुनावली जन्मठेप

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.