इंदापूरच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला भाजपची खुली ऑफर?

बारामती : युती आणि आघाड्यांचं राजकारण सुरु झालंय. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेत. त्यानंतर चार महिन्यात राज्याची विधानसभा निवडणूक होत असते. विधानसभा निवडणुकीची समीकरणं जुळवण्यासाठीही आतापासूनच सुरु झाली आहे. राजकीय पक्ष आपापला आढावा घेत असताना नाराज उमेदवारांचा फायदा मिळवण्याचीही संधी साधताना दिसत आहेत. याचाच प्रत्यय इंदापुरात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कार्यक्रमात आला, ज्यामुळे सर्वांच्या […]

इंदापूरच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला भाजपची खुली ऑफर?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

बारामती : युती आणि आघाड्यांचं राजकारण सुरु झालंय. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेत. त्यानंतर चार महिन्यात राज्याची विधानसभा निवडणूक होत असते. विधानसभा निवडणुकीची समीकरणं जुळवण्यासाठीही आतापासूनच सुरु झाली आहे. राजकीय पक्ष आपापला आढावा घेत असताना नाराज उमेदवारांचा फायदा मिळवण्याचीही संधी साधताना दिसत आहेत. याचाच प्रत्यय इंदापुरात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कार्यक्रमात आला, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.

इंदापूरची विधानसभा राष्ट्रवादीला की काँग्रेसला यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यावरून सर्वत्र संभ्रम असतानाच आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांना तुमच्यासाठी जागाच शिल्लक नाही, तुम्ही तरी काय करणार अशा शब्दात टोमणा मारला. इतक्यावरच न थांबता सुभाष देशमुख यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचे चांगले  संबंध आहेत. त्यामुळे त्यांना काही अडचण यायची नाही असं सांगत त्यांना भाजपची दारे खुली असल्याचे संकेत दिले.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याबाबत विचारणा केली असता सुभाष देशमुखांनी मी अंतर्यामी नाही, तुम्ही त्यांनाच विचारावं, असं म्हणत आपली नाराजी लपवण्याचा प्रयत्न केला.

इंदापूर तालुक्यातील मानकरवाडी येथे एका खासगी कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात जुगलबंदी रंगली. यावेळी बोलताना सुभाष देशमुख यांनी इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपाबद्दलच्या दुखऱ्या विषयावर बोट ठेवत आमदार भरणे यांना भाजपची दारे खुली असल्याचं सूचित केलं. भरणे मामांसाठी सध्या जागाच शिल्लक नाही.. त्यामुळे ते तरी का करणार असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अन्य मंत्र्यांशी आमदार भरणे यांचे चांगले संबंध आहेत.. त्यामुळे त्यांना काहीच अडचण येणार नाही, असं सूचक वक्तव्य केलंय.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. याबद्दल विचारणा केली असता सुभाष देशमुख यांना आपली नाराजी लपवता आली नाही. ते का भेटले.. कधी भेटले हे त्यांनाच विचारा.. मला माहिती व्हायला मी काही अंतर्यामी नाही, असं म्हणत त्यांनी आपली प्रतिक्रिया संपवली.

इंदापूरच्या जागेचा वाद नेमका काय आहे?

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे तब्बल चार वेळा इंदापूरचे आमदार म्हणून निवडून गेले. 2009 च्या निवडणुकीत विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी बंडखोरी करत हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी त्यांचा निभाव लागला नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीने आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यात लढत झाली. सलग चार वेळा विधानसभा जिंकणारे हर्षवर्धन पाटील यांना 2014 मध्ये मात्र राष्ट्रवादीने पराभूत केलं.

2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे इंदापूरची जागा काँग्रेसला द्यायची की राष्ट्रवादीला याबद्दल पेच निर्माण झालाय. त्यातच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अनेकजण इच्छुक आहेत. अनेकांनी तर त्या दृष्टीने तयारीही सुरु केलीय. मात्र आघाडी करायची असेल तर दोन्ही पक्षांकडून इंदापूरच्या जागेबाबत सामंजस्याने निर्णय घ्यावा लागणार आहे.

दुसरीकडे काही दिवसातच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इंदापूर विधानसभा हा संवेदनशील विषय बनू शकतो. त्यातूनच इंदापूरच्या जागेबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी याच मुद्यावर बोट ठेवत विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना टोमणा मारत भाजपची दारे त्यांच्यासाठी खुली असल्याचा बॉम्ब टाकला. त्यामुळे भविष्यात इंदापूर विधानसभेबाबत दोन्ही पक्षाचे नेते कशा पद्धतीने तोडगा काढतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.