Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP Jal Akrosh Morcha : आधी राज ठाकरे आणि आता देवेंद्र फडणवीस, औरंगाबादच्या मोर्चासाठी 14 अटी, आज पाण्यासाठी भाजपचा जल आक्रोश मोर्चा

BJP Jal Akrosh Morcha : संपूर्ण शहरभर भाजपकडून लावले हजारो बॅनर लावण्यात आले आहे. औरंगाबादच्या शिल्लेखाना चौकात लागले 20 ते 25 पेक्षा जास्त बॅनर लावण्या आले आहेत. भाजपचा बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

BJP Jal Akrosh Morcha : आधी राज ठाकरे आणि आता देवेंद्र फडणवीस, औरंगाबादच्या मोर्चासाठी 14 अटी, आज पाण्यासाठी भाजपचा जल आक्रोश मोर्चा
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचा औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 8:52 AM

औरंगाबाद: औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट (Water Crisis) झाला आहे. नागरिकांना वेळेत पाणी येत नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चाचं (Jal Akrosh Morcha) आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी 4 वाजता हा जल आक्रोश मोर्चा सुरू होणार आहे. या मोर्चात तब्बल 10 हजार ते 15 हजार महिला या मोर्चात सहभागी होणार आहेत. हंडे, कळश्या घेऊनच महिला वर्ग या मोर्चात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा मोर्चा मोठ्या प्रमाणावर निघणार असल्याने पोलिसांनी मोर्चासाठी एकूण 13 अटी घातल्या आहेत. या अटींचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, भाजपच्या या जल आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात जोरदार बॅनरबाजी सुरू झाली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर औरंगाबादेतील वातावरण ढवळून निघालेले असतानाच आता भाजपचा मोर्चा निघत असल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

संपूर्ण शहरभर भाजपकडून लावले हजारो बॅनर लावण्यात आले आहे. औरंगाबादच्या शिल्लेखाना चौकात लागले 20 ते 25 पेक्षा जास्त बॅनर लावण्या आले आहेत. भाजपचा बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेला 1680 कोटी रुपयांचा जाब विचारण्यात येणार आहे. संभाजीनागरचे पाणी कुणी अडवले आशा आशयाचे हे बॅनर झळकले आहेत. बॅनरबाजीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी महापौर नंदू घोडीले आणि भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे आमने सामने आले आहेत. पाणी प्रश्नाला भाजप जबाबदार आहे, असा आरोप शिवसेनेच्या नंदू घोडीले यांनी केला आहे तर पाणी प्रश्नाला फक्त शिवसेना जबाबदार आहे अशी भाजपची प्रतिक्रिया आहे. आम्ही पाणी पट्टी अर्ध्यावर आणली तुम्ही गँसचे दर अर्ध्यावर आणणार का? असा सवाल शिवसेनेने भाजपला बॅनरबाजीतून केला आहे.

हे सुद्धा वाचा

दुपारी 4 वाजता मोर्चा

आज दुपारी 4 वाजता हा मोर्चा काढण्यात येणार आहे. पैठण गेटहून या मोर्चाची सुरुवात होणार आहे. पैठण गेट जवळ भव्य स्टेजही उभारण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या जल आक्रोश मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. पैठण गेटहून महापालिकेवर हा मोर्चा जाणार आहे.

14 अटी काय?

  1. मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याचा पोलिसांना अधिकार राहणार
  2. कोणत्याही परिस्थिती मार्गात बदल नको
  3. क्षमतेपेक्षा जास्त लोकांना आमंत्रित करू नका
  4. मोर्चात सहभागी होण्याऱ्यांनी शिस्त पाळा
  5. मोर्चा दरम्यान ध्वनिक्षेपकांचा वापर करताना कायदाचा भंग करु नये
  6. मोर्चा दरम्यान अत्याश्यक सुविधांना बांधा होणार नाही याची काळजी घ्यावी
  7. वाहतूक विभागाकडून काढलेली नियमवाली मोर्चेकऱ्यांसाठी बंधनकारक
  8. मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छता गृहाची सोय करावी
  9. मोर्चात वापरण्यात येणाऱ्या विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, ध्वनीपेक्षक व्यवस्थीत असल्याची खात्री करा
  10. मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांची जबाबदारी संजोयकांचीच
  11. मोर्चा दरम्यान कोणतेही शस्त्र, स्फोटक पदार्थ सोबत ठेवू नयेत
  12. मोर्चात स्वयंसेवक नेमण्यात यावेत, त्यांची माहिती पोलिसांना द्यावी, येणाऱ्यांची संख्या, लोकांची माहिती द्यावी
  13. मोर्चात कोणात्याही प्रकराचे वंश, जात, धर्म, प्रदेश यांचा अपमान होईल असे वक्तव्य करू नये
  14. अटी आणि शर्तीचे उल्लघंन केल्यास कारवाई केली जाणार
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.