अखेर विधान परिषदेला मिळाला नवा सभापती, एकमताने निवड; मुख्यमंत्र्यांनी मानले विरोधकांचेही आभार

आता अनेक राजकीय गणित बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता भाजप नेते प्रा. राम शिंदे यांना एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अखेर विधान परिषदेला मिळाला नवा सभापती, एकमताने निवड; मुख्यमंत्र्यांनी मानले विरोधकांचेही आभार
राम शिंदे
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 11:59 AM

Ram Shinde legislative council chairperson : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता त्यांचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. देवेंद्र फडणवीसांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. यात 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर आता अनेक राजकीय गणित बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता भाजप नेते प्रा. राम शिंदे यांना एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असेल तरी भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा भाजपच्या गळ्यात पडली. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची निवड केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी इच्छुक होत्या. विधानपरिषदेचे सभापतीपद आपल्याला मिळावे, यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र विधान परिषदेतील संख्याबळामुळे भाजपने स्वत:कडे सभापतीपद ठेवत शिवसेनेला धक्का दिला आहे. विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपमधून राम शिंदे आणि प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा रंगली होती. मात्र भाजपकडून राम शिंदे यांना संधी देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ७ जुलै २०२२ पासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. राम शिंदे यांनी काल विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. या पदासाठी अर्ज करण्यासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. तर सभापतीपदासाठी १९ डिसेंबर रोजी निवडणूक होईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, विधानपरिषदेचे सभापतीपदासाठी फक्त राम शिंदे यांचा अर्ज दाखल झाला होता. यामुळे भाजप नेते राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

राम शिंदेंनी पदभार स्वीकारला

राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापती म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी कारभार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी राम शिंदेंना शुभेच्छा दिल्या. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी भाषण केले.

विरोध पक्षाचे अतिशय मनापासून आभार – देवेंद्र फडणवीस

“मी राम शिंदे यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. या सभागृहाने एकमताने राम शिंदे यांची सभागृहाच्या सभापतीपदी निवड केली, त्याबद्दल मी सभागृहाचेही आभार मानतो. सभापतीपदाची निवड ही निवडणूक पद्धतीने होत असली तरी एकमताने सभापतीची निवड करावी, या परंपरेला साजेसा निर्णय विरोधी पक्षाने घेतला. त्याबद्दल मी विरोध पक्षाचे अतिशय मनापासून आभार मानतो. प्राध्यापक राम शिंदे हे जे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चित सवय आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही अतिशय शिस्तीने आणि संवेदनशीलतेने या सभागृहाचा कारभार चालवाल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.