Raksha Khadse | खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. Raksha Khadse Corona Positive

Raksha Khadse | खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण
रक्षा खडसे, भाजप खासदार, रावेर
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 10:52 AM

जळगाव: रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बुधवारी रात्री रक्षा खडसे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. रक्षा खडसे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. (BJP MP Raksha Khadse tested corona Positive)

खासदार कार्यालयाकडून माहिती

रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. रक्षा खडसे यांची प्रकृती बिघटल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे, अशी माहिती मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

रक्षा खडसे यांची प्रकृती स्थिर

खासदार रक्षा खडसे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या. रक्षा खडसे यांनी तीन दिवसांपूर्वी वाढीव वीज बील, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन मुक्ताईनगर येथे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावेळी रक्षा खडसे यांच्या सोबत मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

अचानक वीज कापून शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढवल्या

वीज बिलांसाठी अचानक संपूर्ण शेतकऱ्यांचे कनेक्शन पूर्वसूचना न देता कट केले जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न घेण्याचे दिवस आहेत,सरकारला हे माहिती असताना वीज कापली जातीय. शेतकऱ्यांचे हित न पाहता महाविकासआघाडी सरकारने वीज वितरण कंपनीला वीज कापण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट केली जात असून शेतकऱ्यांची दुरवस्था केली आहे, असं खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. त्यांनी वीज वितरण कंपनीला व मुक्ताईनगर तहसीलदार कार्यालयाला भाजपच्यावतीने निवेदन दिले आणि सरकारचा निषेध केला.

महाराष्ट्राची संस्कृती कुठे चाललीय?

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाण वाढत होत आहे. त्यामुळे आपली महाराष्ट्रातली संस्कृती कुठे चालली आहे, याचा विचार केला पाहिजे, असं खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात पुढे येत आहेत. त्यात काही मोठे लोक आणि मंत्र्यांसारख्या व्यक्तींचा सहभाग असल्याचं कळतं हा दुःखाचा विषय आहे. त्यामुळे आपली महाराष्ट्रातील संस्कृती कुठे चालली आहे असा सवाल त्यांनीकेला.

एकीकडे महिलांचा सन्मान ,महिलांना आरक्षण म्हणायचं आणि पदावर बसणाऱ्यांकडूनचं महिलांवर अत्याचार होत असतील, तर यापेक्षा दुःखाचा विषय महाराष्ट्रासाठी काय असेल अशी संतप्त प्रतिक्रिया मुक्ताईनगर येथे रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे केला. जळगावच्या यावल दरम्यान 15 मजूरांचा मृत्यू होणे, अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेने जिल्हा हादरला आहे, असंही रक्षा खडसे म्हणाल्या.

संबंधित बातम्या

‘मिशन लसीकरण’; राज्यात कोरोना लसीकरणाच्या कामाला वेग; चांद्यापासून बांद्यापर्यंत जय्यत तयारी!

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांनी तपासणी करुन घ्या : चंद्रकांत खैरे

(Raksha Khadse tested corona Positive)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.