Kolhapur North By Election: कोल्हापूर उत्तरची निवडणूक भाजपनेच लादली; सतेज पाटील यांचा आरोप

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीवरून कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक भाजपने लादली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती.

Kolhapur North By Election: कोल्हापूर उत्तरची निवडणूक भाजपनेच लादली; सतेज पाटील यांचा आरोप
शिवसेनेचे आमदार सतेज पाटीलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 1:17 PM

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या  (Kolhapur North) पोटनिवडणुकीवरून कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील (satej patil) यांनी भाजपवर (bjp) टीका केली आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक भाजपने लादली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती. भाजपचे वरचे नेते अनुकूल होते. मात्र खालचे नेते अनुकूल नव्हते असं मला वाटतंय. या सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतो असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. पण त्यांनी निर्णय जाहीर केला. आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतोय, असं सतेज पाटील यांनी सांगितलं. सतेज पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचेल आणि भाजपच्या कृत्यांचा पर्दाफाश होईल, असा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे. भाजपचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. आपआपसात काही उणीवा असतील तर त्या बाजूला ठेवून एकसंघपणे ही निवडणूक लढविण्याची सर्वांची भूमिका आहे. उद्धव ठाकरेंचा आदेश अंतिम असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी काल जाहीर केलंय. त्यांचे काही गैरसमज आजच्या बैठकीत दूर होतील. स्थानिक विषय इथेच बसून मिटू शकतात, असं सांगतानाच या पोट निवडणुकीत आम्ही 100 टक्के विजयी होऊ, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

आघाडीचाच उमेदवार विजयी होईल

कोल्हापूरचा स्वाभिमान डिवचण्याचे काम भाजपने केलं आहे. लोकं त्याला उत्तर देतील. मतपेटीतून ते दिसून येईल. महाविकास आघाडीचाच उमेदवार या निवडणुकीत विजयी होईल, असंही ते म्हणाले.

जाधवांच्या पत्नीला उमेदवारी

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं आपली उमेदवारी जाहीर केलीय. काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तशी माहिती काँग्रेसनं ट्वीटरद्वारे दिलीय. दरम्यान, काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे, आम आदमी पक्षही या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुन्हा पाऊल टाकण्याच्या तयारी आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी आजन्म काम करू, Raj Thackeray यांनी दिलेली प्रतिज्ञा जशीच्या तशी

Maharashtra News Live Update : भाजपला काही काम उरले नाही, सकाळ झाली की टीका करतात-आदित्य ठाकरे

PM मोदींच्या कामाचा धडाका, लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यातले 38 प्रकल्प झपाट्यानं पूर्ण करणार, वाचा 3 महत्त्वाचे प्रोजेक्ट!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.