भाजप-सेनेचे लव्ह मॅरेज होते, पुड्या बांधता-बांधता तयार होते मतांची ब्लड बँक; गुलाबराव पाटलांचे फटाके!

गुलाबराव पाटील म्हणाले की, मुंबई ही मराठी माणसांची आणि शिवसेनेची आहे. शिवसेना आणि मुंबईचे नाते 1966 पासून आहे. मुंबईत शिवसेनाप्रमुख नसते, तर काय झाले असते, हे गुलाबराव पाटलांनी सांगण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांना जास्त माहिती आहे.

भाजप-सेनेचे लव्ह मॅरेज होते, पुड्या बांधता-बांधता तयार होते मतांची ब्लड बँक; गुलाबराव पाटलांचे फटाके!
मंत्री गुलाबराव पाटलांनी तुफान फटकेबाजी केली.
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 10:18 AM

लासलगावः पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगावच्या ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि एकनाथ खडसे यांचा कलगीतुरा उभ्या महाराष्ट्राने काही दिवसांपूर्वी पाहिला. त्यांनी एकमेकांची चक्क डाकू, चोर म्हणत उद्धारनी केली. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. पेपरात आणि टीव्हीवर बातम्या झळकल्या. आता त्याच गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा फटाके फोडलेत. ते लासगावमध्ये आले असता बोलत होते. पाटील यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि शिवसेनेचे लव्ह मॅरेज होते, अशी आठवण उगाळली. शिवाय शिवसेना (Shiv Sena) पैलवान आहे आणि आम्हीही पैलवान आहोत. मुंबईचे घोडामैदान दूर नाही, असा इशाराही दिला. यावेळी त्यांनी आपला प्रवासही सांगितला. 1982 मध्ये आपण टपरीचालक होतो. व्हिडिओ चालवायचो. मी एका शेतकरी कुटुंबातील. आमदार होईल, असे स्वप्नही बघितले नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी ते पूर्ण केले, असा आवर्जुन उल्लेख यावेळी केला. कधी भावुक तर कधी आक्रमक होत पाटलांनी फटकेबाजी केली. जाणून घेऊयात पाटलांचा हा वेगळाच अंदाज.

चंद्रकांत पाटलांना इशारा…

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पाच राज्यांच्या निकालांमध्ये चार राज्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. मुंबई महानगरपालिकेत गेल्या पंचवार्षिकमध्ये युती न करता शिवसेनेने निवडणूक लढली. केंद्र आणि महाराष्ट्र वगळता देशात सर्वाधिक भाजपचे मुख्यमंत्री असतानाही मुंबईचा महापौर शिवसेनेचा होता. मुंबई महानगरपालिकेसाठी चंद्रकांत पाटलांनी तयारी करावी. तुम्हीही पैलवान आहात, आम्ही ही पैलावान आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

बाळासाहेब नसते तर…

गुलाबराव पाटील म्हणाले की, मुंबई ही मराठी माणसांची आणि शिवसेनेची आहे. शिवसेना आणि मुंबईचे नाते 1966 पासून आहे. मुंबईत शिवसेनाप्रमुख नसते, तर काय झाले असते, हे गुलाबराव पाटलांनी सांगण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांना जास्त माहिती आहे. हे पाच वर्ष सोडले, तर पंचवीस वर्ष भाजप आणि शिवसेनेचे लव्ह मॅरेज होते, याची जाणही त्यांनी यावेळी करून दिली. पाटील म्हणाले की, मी एका शेतकरी कुटुंबातील आहे. आमदार होईल, असे स्वप्न बघितले नव्हते. कुटुंबातील कोणी साधे ग्रामपंचायत सदस्यही नव्हते. 1982 साली मी पानटपरी आणि व्हिडिओ चालक होतो. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मंत्री पदापर्यंत पोहोचले, असा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

पक्ष वेगळे असले तरी…

पाटील म्हणाले की, राजकारणी माणसाने चार लोकांशी नाते ठेवले पाहिजे. पहिले शेतकरी, दुसरे पोलीस, तिसरे व्यापारी आणि चौथे डॉक्टर. ही मतांची ब्लड बँक आहे. पोलिसाला फोन करून एक मोटरसायकल सोडल्यास दोन मते पक्की होतात. डॉक्टरांना फोन करून बिल कमी केले, तर दहा मते पक्की होतात. एक शेतकऱ्याची विजेची लाइन जोडून दिली, तर 50 मते मिळतात. व्यापाऱ्याला त्रास नाही दिला, तर पुड्या बांधता बांधता शंभर मते पक्की होतात. राजकारणी माणसाची सुरुवातीला वेगवेगळी परिस्थिती असते. वेगवेगळ्या विषयाच्या डॉक्टरप्रमाणे आमचे पक्ष वेगवेगळे असले, तरी ही माणसाची भावनाही कार्य करण्याची असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.