ठाणे: राज्यात एकीकडे शिवसेना भाजपमध्ये विस्तव जात नाही. दुसरीकडे कल्याण तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना भाजपने एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली आहे. इथं भाजप मोठा भाऊ तर शिवसेना छोटा भाऊ झाला आहे. भाजपकचे सरपंचपद तर शिवसेनेकडे उपसरपंचपद गेले आहे. राज्यात काही वाद असो गावाच्या विकासासाठी आम्ही एकत्रित आले आहेात, असं नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचांनी सांगितलं आहे. (BJP Shivsena came together in Manivali Gram Panchayat of Kalyan)
कल्याण तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक पार पाडली. सरपंच कोणत्या पक्षाचा होणार यासाठी सर्व पक्षांनी प्रतिष्ठान पणाला लावली होती. मुरबाड तालुक्यात निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच तिन्ही पक्षांच्या नेत्यांना जाऊन भेटले प्रत्येक पक्षाने आपला सरपंच बसवण्याच्या दावा केला त्यामुळं संभ्रम निर्माण झाला.
कल्याण तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायतीमध्ये राज्यात एक दुसऱ्याला पाण्यात बघणारे पक्ष एकत्रित आले आहेत. नऊ सदस्य असलेल्या मानिवली ग्रामपंचायतीमध्ये तीन शिवसेनेचे, तीन भाजपचे आणि तीन इतर सदस्य निवडून आले होते. अखेर सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी शिवसेना भाजप एकत्रित आले. सरपंचपदी भाजपच्या माया गायकर या बिनविरोध निवडून आल्या. शिवसेनेचे चंद्रकांत गायकर हे उपसरपंच पदी निवडून आले. या दोन्ही पक्षाला एकत्रित आणणारे ठाणे पालघर जिल्ह्याचे भाजप सचिव निलेश शेलार यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
भाजप आणि शिवसेनेत राज्यात काही असू द्या गावाच्या विकासाठी आम्ही एकत्रित आल्याची भावना नवनियुक्त सरपंच माया गायकर आणि उपसरपंच चंद्रकांत गायकर यांनी व्यक्त केली आहे. भाजपचे मुरबाड मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की, गावाच्या विकास कामात राजकारण होता कामा नये. गावकऱ्यांनी विकासकरीता एकत्रित येण्याचे ठरविले असेल तर त्याला भाजपचा पाठिंबा आहे.
‘जिवंत आहे तोपर्यंत भाजपला बंगालमध्ये संधी नाही’, ममता बॅनर्जींचं आव्हान https://t.co/VOEjHePqcR @MamataOfficial @BanglarGorboMB @narendramodi @AmitShah @BJP4India #MamataBanerjee #WestBengal #WestBengalElection2021 #BJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 10, 2021
संबंधित बातम्या:
सरपंचाची निवड सदस्यांतूनच, गोंधळ नको: हसन मुश्रीफ
ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला एक नंबरचा पक्ष करा, उद्धव ठाकरेंचे आदेश
(BJP Shivsena came together in Manivali Gram Panchayat of Kalyan)