Raj Thackeray | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीला, भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण

चंद्रशेखर बावन्नकुळे आणि राज ठाकरे यांच्या भेटीपूर्वी राज ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये जवळपास एक तासभर चर्चा झाली.

Raj Thackeray | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीला, भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण
चंद्रशेखर बावनकुळे यांची शीवतीर्थवर राज ठाकरेंची भेटImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 1:01 PM

मुंबईः मनसे आणि भाजपची (BJP-MNS Alliance)युती होण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरतायत. युतीचे संकेत देण्यासाठी राजकीय नेत्यांच्या भेटी-गाठींचे सत्रही वाढत आहेत. नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या नव्या शीवतीर्थ या बंगल्यावर ही भेट झाली. काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीत काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र भेटीला नक्कीच काहीतरी राजकीय अर्थ असल्याचं सांगण्यात येतंय.

काल देवेंद्र फडणवीसांची भेट

चंद्रशेखर बावन्नकुळे आणि राज ठाकरे यांच्या भेटीपूर्वी राज ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये जवळपास एक तासभर चर्चा झाली. यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर खलबतं झाली, हे अद्याप पुढे येऊ शकलेलं नाही. उद्यापासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. राज ठाकरे यांच्या शीवतीर्थ बंगल्यावर पहिल्यांदाच गणपतीची स्थापना होणार आहे. या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना त्यांनी या भेटीत आमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे. असे असले तरीही अमित शाह यांना 5 सप्टेंबर रोजीचा मुंबई दौरा, मुंबई महापालिका निवडणुकांची रणनीती लक्षात घेता, मनसे-भाजपची ही जवळीक बरंच काही सांगून जाणारी ठरतेय. मनसेच्या ताब्यातील मराठी वोट बँक काबीज कऱण्यासाठी भाजप मनसेशी जवळीक साधत आहे, असेही म्हटले जात आहे.

सचिन खरात यांचा राज ठाकरेंना इशारा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी मात्र राज ठाकरे यांना इशारा दिलाय. भाजपला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत. त्यांनी ज्या ज्या पक्षांशी युती केली, तो पक्ष संपवला, असा आरोप खरात यांनी केला. आसमध्ये तेच झालं, पंजापमध्ये अकाली दल, गोव्यात गोमांतक पक्षाबाबत तेच घडलं. महाराष्ट्रात शिवसेनेला हा डाव कळला अन् बिहारमध्येही नितीश कुमार सावध झाले, त्यामुळे राज ठाकरेंनी केवळ काही नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजपसोबत युती करू नये, असा सल्ला सचिन खरात यांनी दिलाय.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.