Eknath Shinde : ‘देवेंद्रजी मागे पडले, एकनाथजी पुढे या….’ चंद्रशेखर बावनकुळे स्पष्ट बोलले
Eknath Shinde : आज वर्तमानपत्रांमध्ये 'राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहीरात प्रसिद्ध झालीय. त्या जाहीरातीची चर्चा होण स्वाभाविक आहे. कारण या जाहीरातीमधून बरेच राजकीय अर्थ निघत आहेत.
मुंबई : ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहीरात आज वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालीय. या जाहीरातीमध्ये सर्वेक्षणाचा आधार घेण्यात आलाय. त्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती असल्याचा दावा करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पसंतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या यांच्या मागे असल्याच जाहीरातीमध्ये दाखवलं आहे. सहाजिकच त्यामुळे ‘राष्ट्रात मोदी. महाराष्ट्रात शिंदे’ या जाहीरातीची चर्चा होणं स्वाभाविक होतं.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी गाठून या जाहीरातीबद्दल विचारलं, त्यावर त्यांनी दोघेही चांगलं काम करतायत, असं सांगितलं.
काय म्हणाले बावनकुळे?
“मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघे चांगलं काम करतायत. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून एक चांगलं, लोकप्रिय बजेट मांडलं. सरकारचा परफॉर्मन्स चांगलाय, तो सर्वेक्षणातून दिसतोय. त्यामुळे देवेंद्रजी मागे पडले, एकनाथजी पुढे गेले, या निष्कर्षाला अर्थ नाही” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
जाहीरातबाजीमध्ये नका पडू
“शिवसेना आणि भाजपा महायुती भाऊ म्हणून काम करते. देवेंद्रजी आणि एकनाथजी दोघांच्या मनात परस्पराद्दल चांगली भावना आहे. कोणाला जास्त पसंती? हे दोघांच्याही मनात येत नाही. दोघे चांगले बॅट्समन आहेत. कोण पुढे, कोण मागे हे महत्वाच नाही. राज्यातील जनतेला ज्या अपेक्षा आहेत, ते पूर्ण होणं महत्वाच आहे. त्यामुळे जाहीरातीमध्ये न पडता, डबल इंजिन सरकारच काम जनतेपर्यंत पोहोचवण आवश्यक आहे” असं बावनकुळे म्हणाले. कुठल्या पसंतीला सर्वात जास्त महत्व
“कोणाच महत्व, कोणामुळे कमी होत नाही. 45 प्लस खासदार निवडून आणण्यावर आम्ही काम करतोय. कमजोर समजता म्हणून कोणी कमजोर होत नाही. जाहीरातीपेक्षा निवडणुकीतील पसंतीला जास्त महत्व आहे” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.