माझी अक्कल काढतील…किशोरी पेडणेकरांना बावन्नकुळेंचं उत्तर काय?

आगामी निवडणुकीत शिवसेनेचा एकही नेता नसेल. पक्षातील सगळे नेते शिंदे गटात येतील, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी केलं होतं. त्यांना उत्तर देताना किशोरी पेडणेकरांनी जोरदार टीका केली होती.

माझी अक्कल काढतील...किशोरी पेडणेकरांना बावन्नकुळेंचं उत्तर काय?
चंद्रशेखर बावन्नकुळे, भाजप प्रदेशाध्यक्षImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 9:55 AM

नंदूरबारः किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) असतील किंवा चंद्रकांत खैरे असतील. शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांची अवस्था सध्या वाईट आहे. त्यामुळे असे लोक माझी अक्कल काढतील, बुद्धी काढतील. त्यात मला फारसं वाईट वाटत नाही.. एक वेळ अशी येईल की त्यांना त्यांची अशी वक्तव्य बंद करावी लागतील, असं वक्तव्य चंद्रशेखर बावन्नकुळे (Chandrashekhar Bawannkule) यांनी केलंय. नंदूरबारमध्ये मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. काल मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी चंद्रशेखर बावन्नकुळेंवर जोरदार टीका केली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावन्नकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले चंद्रशेखर बावन्नकुळे?

किशोरी पेडणेकरांच्या वक्तव्याला उत्तर देताना चंद्रशेखर बावन्नकुळे म्हणाले, ‘ जेव्हा जनाधार कमी होतो. माणसं तुटत जातात. संघटन कमी होतं. तेव्हा असे वक्तव्य येतात. माझी अक्कल काढणे, माझी बुद्धी काढतील. पण मला काही वाईट वाटत नाही. त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. येत्या काही दिवसात एक वेळ अशी येईल, त्यांना त्यांची वक्तव्य बंद करावी लागतील.

किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य काय?

आगामी निवडणुकीत शिवसेनेचा एकही नेता नसेल. पक्षातील सगळे नेते शिंदे गटात येतील, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी केलं होतं. त्यांना उत्तर देताना किशोरी पेडणेकरांनी जोरदार टीका केली.

नुसतं बावन्नकुळे आडनाव असून चालत नाही, तर डोक्यात पण काहीतरी असावं लागतं. असा टोमणा पेडणेकरांनी लगावला होता.

गेल्या काही दिवसांपासून शिंदेगटातील नेत्यांकडून हिंसक वक्तव्य येत आहेत. कुणी तंगडं तोडेल, कुणी हात-पाय तोडेल अशा धमक्या देत आहेत, त्यामुळे या सर्वांची तक्रार पोलिसांकडे करणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी म्हटलं होतं. शिवसेनेचं शिष्टमंडळ घेऊन त्या पोलीस स्टेशनमध्ये जाणार होत्या.

पेडणेकरांकडून शिंदेंची स्तुती?

किशोरी पेडणेकरांनी काल अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केली. शब्द पाळण्यात एकनाथ शिंदे पक्के आहेत, असं बोलून गेल्या. मात्र आता ते शब्द फिरवणारे झाले आहेत, असंही पुढे त्यांनी जोडलं.

मुंबई महापालिकेतील वॉर्डांची संख्या महाविकास आघाडीत असताना एकनाथ शिंदेंनीच 236 केली. आता भाजपसोबत सत्तेत आल्यावर त्यांनीच ती 227 केली. हे योग्य नसल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.