मोठी बातमी! पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी भाजपचा मेगा प्लॅन, विधान परिषदेसह मंत्रि‍पदी वर्णी लागण्याची शक्यता

पंकजा मुंडे यांच्या समर्थकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भाजप पंकजा मुंडे यांना मोठी संधी देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजप आता पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मोठी बातमी! पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी भाजपचा मेगा प्लॅन, विधान परिषदेसह मंत्रि‍पदी वर्णी लागण्याची शक्यता
भाजप नेत्या पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 6:28 PM

भाजपच्या गोटातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी पक्ष कंबर कसणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपकडून पंकजा यांच्या पुनर्वसनासाठी प्लॅन आखण्यात आल्याची माहिती आहे. भाजप पंकजा मुंडे यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पाठवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवल्यास त्यांना राज्यात मंत्रीपद मिळण्याचीदेखील शक्यता आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या माजी आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री होत्या. तसेच त्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे हे लोकप्रिय नेते होते. त्यांच्या निधननंतर पंकजा या महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त सक्रिय झाल्या. पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ओबीसी समाजाचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाची मते आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 13 जुलैला निवडणूक होणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना खरंच विधान परिषदेची संधी दिली जाते का? याबाबतच राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे या ओबीसी चेहरा आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेत संधी दिली जाणार आहे. तसेच आगामी तीन महिन्यांसाठी मंत्रिमंडळ विस्तार झाला तर पंकजा मुंडे यांची मंत्रि‍पदी देखील वर्णी लागण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणातच सक्रिय ठेवण्याचा निर्णय पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसन मागील गणित काय?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. या निवडणुकीत बीडमध्ये स्थानिक पातळीवर अनेक गोष्टी बघायला मिळाल्या आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर बीडमध्ये मराठा आणि ओबीसी समाज यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. राज्यात ओबीसी समाजाच्या नागरिकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला खूश करण्यासाठी पंकजा मुंडे यांची मंत्रि‍पदी वर्णी लागू शकते. तसं केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाकडून भाजपला चांगली मते मिळू शकतात.

Non Stop LIVE Update
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा..
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा...
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?.