पराभवानंतर भाजपचा मोठा ॲक्शन प्लॅन, 16 नेत्यांची फौज तयार; काय दिली जबाबदारी?

भाजपला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश आलं नाही. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपच्या नेत्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. उद्या दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. आज संघाची पुण्यात बैठक होणार आहे. तर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

पराभवानंतर भाजपचा मोठा ॲक्शन प्लॅन, 16 नेत्यांची फौज तयार; काय दिली जबाबदारी?
पराभवानंतर भाजपचा मोठा ॲक्शन प्लॅन, 16 नेत्यांची फौज तयार
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 1:33 PM

भाजपला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. भाजपचे महाराष्ट्रात 2019मध्ये 22 खासदार होते. या निवडणुकीत ही संख्या 9वर गेली आहे. 13 जागांवर पराभूत होणं हा भाजपसाठी मोठा सेटबॅक असल्याचं सांगितलं जात आहे. या पराभवानंतर भाजपने अंग झटकून कामाला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे विधानसभा निवडणुकीत भरून काढण्यासाठी भाजपने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार ज्या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला, त्या मतदारसंघाची समीक्षा करण्यात येणार आहे. त्यासाठी बड्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 16 नेत्यांची फौजच भाजपने तयार केली आहे.

लोकसभेतील पराभवानंतर भाजपने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार राज्यातील पराभूत मतदारसंघातील कारणांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी प्रमुख नेत्यांवर मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आपलं होमग्राऊंड राखू न शकलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांवर नांदेडच्या विश्लेषणाची जबाबदारी देण्यात आली आहे. महायुतीने गमावलेल्या 33 मतदारसंघांचाही आढावा घेतला जाणार आहे.

जिंकलेल्या जागांचा आढावा

भाजप केवळ पराभूत मतदारसंघाचाच आढावा घेणार नाहीये. तर जिंकलेल्या जागांवरही भाजपने निरीक्षक पाठवून आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच येत्या 22 जूनपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबतचा अहवाल द्यावा लागणार आहे. बीडची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे, तर बारामतीची मंगलप्रभात लोढा आणि श्रीकांत भारतीय यांच्याकडे चंद्रपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या नेत्यांवर जबाबदारी

जालना – चंद्रकांत पाटील

रामटेक – खा. अनिल बोंडे

अमरावती – आशिष देशमुख

वर्धा – आ. प्रवीण दटके

भंडारा-गोंदिया – रणजीत पाटील

यवतमाळ-वाशिम – आ. आकाश फुंडकर

दिंडोरी – विजयाताई रहाटकर

हिंगोली- आ. संजय कुटे

उत्तर-पश्चिम मुंबई – सुनील कर्जतकर

दक्षिण मुंबई – माधवी नाईक

उत्तर-मध्य मुंबई – हर्षवर्धन पाटील

उत्तर-पूर्व मुंबई – आ. राणा जगजितसिंह

मावळ – आ. प्रवीण दरेकर

अहमदनगर- खा. मेधा कुलकर्णी

माढा – आ. अमित साटम

भिवंडी – गोपाळ शेट्टी

बावनकुळेही दौरा करणार

दरम्यान आजपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विदर्भ दौऱ्यावर आहेत. बावनकुळे रामटेक, उमरेड, हिंगणा विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.

संघही दक्ष

भाजपप्रमाणेच आता संघही दक्ष झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची आज पुण्यात बैठक होत आहे. दुपारी पुणे शहरातील संघ मुख्यालय मोतीबाग येथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर चर्चा होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून आमदारांची कार्यशाळाही घेतली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने संघाकडून आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. महत्त्वाच्या आमदारांना प्रशिक्षित करुन विधानसभेचा आढावा घेतला जाणार आहे.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....