भाजपची 115 उमेदवारांची यादी तयार, 25 विद्यमान आमदारांना डच्चू – सूत्र

भाजपने 115 उमेदवारांची यादी तयार केल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपच्या खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली.  महत्त्वाचं म्हणजे 115 जणांच्या यादीत विद्यमान 25 आमदारांची (BJP to cut seating MLA ticket) नावं नाहीत. त्यांना डच्चू मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजपची 115 उमेदवारांची यादी तयार, 25 विद्यमान आमदारांना डच्चू - सूत्र
Follow us
| Updated on: Sep 23, 2019 | 10:15 AM

BJP to cut seating MLA ticket मुंबई : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता उमेदवार याद्या निश्चितचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये 5 उमेदवार जाहीर केल्यानंतर, काँग्रेसनेही 50 उमेदवारांची यादी निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी भाजपने 115 उमेदवारांची यादी तयार केल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपच्या खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली.

महत्त्वाचं म्हणजे 115 जणांच्या यादीत विद्यमान 25 आमदारांची (BJP to cut seating MLA ticket) नावं नाहीत. त्यांना डच्चू मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  ज्या आमदारांच्या सर्व्हेमध्ये नकारात्मक कामगिरीचा अहवाल आला, अशा आमदारांना यंदा तिकीट मिळणार नाही.

भाजपच्या यादीत 100 विद्यमान आमदारांचा समावेश आहे. तर इतर पक्षातून आलेल्या 15 जणांनाही या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणुकीवेळीही भाजपने अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं होतं. यामध्ये किरीट सोमय्या, सोलापूरचे शरद बनसोड, पुण्याचे अनिल शिरोळे, नगरचे दिलीप गांधी, दिंडोरीचे हरीशचंद्र चव्हाण, लातूरचे सुनील गायकवाड यांचा समावेश होता.

भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 122 जागा जिंकत, सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र यंदा भाजपची शिवसेनेसोबत युती आहे. युती करताना दोन्ही पक्ष सम-समान जागा लढवण्याचं ठरलं होतं. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने 63 जागी विजय मिळवला होता.  त्यामुळे आता दोन्ही पक्षात कोणता फॉर्म्युला निश्चित होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जर फिप्टी फिप्टी फॉर्म्युला ठरला, तर भाजपला तिकीट वाटप करताना मोठी तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे सुमार कामगिरी असणाऱ्या आमदारांचं तिकीट कापण्याची तयारी भाजपने केली आहे. अंतर्गत संस्थांनी सर्व्हे करुन या आमदारांची माहिती मिळवल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावरुन त्यांची तिकीटं धोक्यात आली आहेत.

जून महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विष्णू सावरा, अंबरिशराजे आत्राम यांचा समावेश होता. आता या माजी मंत्र्यांना भाजपकडून तिकीटं दिली जातात की नाही हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या 

भाजप 30 विद्यमान आमदारांची तिकीटं कापणार? 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.