भाजपाचं पुढचं टार्गेट आता मुंबई महापालिका, शिर्डीमध्ये अमित शाहांनी पत्ते ओपन केले, कार्यकर्त्यांना काय सांगितलं?

भाजपाच्या अधिवेशनाचा समारोप रविवारी शिर्डीत झाला. या समारोप समारंभास भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

भाजपाचं पुढचं टार्गेट आता मुंबई महापालिका, शिर्डीमध्ये अमित शाहांनी पत्ते ओपन केले, कार्यकर्त्यांना काय सांगितलं?
Follow us
| Updated on: Jan 12, 2025 | 6:44 PM

भाजपाच्या अधिवेशनाचा समारोप रविवारी शिर्डीत झाला. या समारोप समारंभास भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीबाबत देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले अमित शाह? 

इतका आवाज कमी का? मुंबईपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे, येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत याहून मोठा विजय आपण मिळवणार आहोत, असं म्हणत त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबाबतचा आपला इरादा स्पष्ट केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला माहिती नाही की तुम्ही किती मोठं काम केलंय, शरद पवारांच्या दगा फटक्याच्या राजकरणाला मातीत घालण्याचं काम महाराष्ट्रानं केलं आहे.  हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने जागा दाखवली आहे, पवारांना सांगू शकतो की सर्व विभागात आमच्या जागा जिंकल्या आहेत, असा घणाघात यावेळी अमित शाह यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे, ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. तर अजित पवार यांचीच राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी आहे. घरणेशाहीला थोबाडीत मारत तुम्ही सिद्धांताचे राजकारण चालतं हे दाखवून दिलं, मी शरद पवारांना सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रात 19, कोकणात 16, पश्चिम महाराष्ट्रात 24 जागा आम्ही जिंकल्या आहेत. धोका देण्याची सुरुवात शरद पवारांनी तर शेवट उद्धव ठाकरेंनी केला. या मंडळींना घरी बसवण्याचे काम तुम्ही केलं. असंही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांचं कौतुक

पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न पाहिले, कामही सुरू केलं. आता दुसऱ्या टर्ममध्ये मोदीजी आणि फडणवीस प्रत्येक शेतावर पाणी पोहोचवतायेत पुढील निवडणुकीत मतं मागायला येण्यापूर्वी शेतात पाणी पोहोचवणार यापूर्वीचे लोक आत्महत्या रोखू शकले नाहीत,  ३१ मार्च २०२६ पूर्वी देशातून नक्षलवाद संपवणार, असं अश्वासनही यावेळी अमित शाह यांनी यावेळी दिलं.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.