Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

101 वऱ्हाडींचे रक्तदान, धुळ्यात पाटलांच्या लग्नसोहळ्यात सामाजिक बांधिलकी

कन्येच्या विवाह सोहळ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करुन तब्बल 101 रक्तपिशव्या संकलित केल्या.

101 वऱ्हाडींचे रक्तदान, धुळ्यात पाटलांच्या लग्नसोहळ्यात सामाजिक बांधिलकी
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 4:06 PM

धुळे : मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिंदखेडा तालुक्यातील सार्वे येथील पाटील कुटुंबीयांनी एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. पाटील कुटुंबियांनी आपल्या कन्येच्या विवाह सोहळ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करुन तब्बल 101 रक्तपिशव्या संकलित केल्या. विशेष म्हणजे लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींनीही या उपक्रमाला प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. (blood donation camp in duhle marriage)

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यानुसार विविध पक्ष आणि संघटनांकडून रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. परंतु, शिंदखेडा तालुक्यातील सार्वे येथील पाटील कुटुंबाने चक्क विवाह सोहळ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करुन अनेकांसमोर नवा आदर्श उभा केला आहे.

सार्वे येथील तुषार आत्माराम पाटील यांची सुकन्या स्वाती हिचा विवाह शिरपूर येथील दशरथ काशीराम पाटील यांचे चिरंजीव दर्शन यांच्याशी संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात वधू आणि वराच्या पित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. वधूवरांच्या पित्यांनी रक्तदान केल्यानंतर त्यांनी लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींनाही रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वऱ्हाडी मंडळींनीही उत्स्फूर्तपणे शिबिरात भाग घेतला. या विवाह सोहळ्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करण्यात आले. येणाऱ्या प्रत्येकास मास्क आणि सॅनिटायझर या विवाह सोहळ्यात देण्यात आले. यावेळी शिबिरात 101 जणांनी रक्तदान केले.

वधूवरांच्या परिवाराकडून मुख्यमंत्री एक लाख रुपये

दरम्यान, यावेळी वधू आणि वराच्या परिवाराने मुख्यमंत्री साहाय्यता निधीत 1 लाख रुपये जमा केले. दोन्ही परिवाराने जपलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पंडितराव पाटील तसेच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही रक्तदान करण्याचे आवाहन केल. यावेळी रावसाहेब शरद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, पं.स.सदस्य राजेंद्र देवरे, माजी सभापती किशोर रंगराव, नगराध्यक्ष अनिल वानखेडे, सरपंच ज्ञानेश्वर पाटील, डोंगरगावचे प्रकाश पाटील, कलमाडी येथील विजेंद्र झालसे या मान्यवरांनी या विवाह सोहळ्यास हजेरी लावली. पाटील कुटुंबीयांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या :

कोल्हापूरच्या तालमीत पुन्हा घुमतोय शड्डू ठोकल्याचा आवाज

काश्मिरची कली साताऱ्याच्या पाटलांची सून, माप ओलांडताना खास उखाणा

Gold Rate : सोनं वाढलं की दरात झाली घसरण? पाहा आठवड्याभराचे भाव

(blood donation camp in duhle marriage)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.