जाहीर कार्यक्रमाच्या भाषणात भाजपच्याच बड्या नेत्यांनं एकनाथ खंडसेंना मुख्यमंत्रीच केले !
आदिवासींच्या या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उशिराने उपस्थित राहिले होते, शिंदे व्यासपीठावर नसतांना आदिवासी विकास मंत्री गावीत शिंदे यांचे कौतुक करत होते.
नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही. कधीकाळी भाजपमध्ये असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते आणि त्या शर्यतीतही होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्री पदी विराजमान होता आले नाही. मात्र, भाजपच्याच एका नेत्यानं त्यांना मुख्यमंत्री एकनाथ खडसे असं म्हंटल्याने आणि तेही जाहीर कार्यक्रमात म्हंटल्याने हे विधान भुवया उंचवणारे ठरले आहे. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर आदिवासी विभागाच्या वतिने जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात आला आहे. त्याच कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांचं भाषण झाले होते. त्यात भाषणात उपस्थितांच्या नावाचा उल्लेख करत असतांना मुख्यमंत्री एकनाथ खडसे असा उल्लेख केला. खरंतर उपस्थित व्यक्तींच्या भुवया उंचावल्या होत्या.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री यांनी हे विधान केले आहे.
खरंतर या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती, त्याच दरम्यान गावीत यांच्याकडून आडनावाचा चुकीचा उल्लेख झाला.
आदिवासींच्या या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उशिराने उपस्थित राहिले होते, शिंदे व्यासपीठावर नसतांना आदिवासी विकास मंत्री गावीत शिंदे यांचे कौतुक करत होते.
याचवेळी आदिवासी विकास मंत्री यांच्याकडून शिंदे ऐवजी खडसे असा उच्चार झाला होता, शिंदे यांच्या कामाबद्दल बोलत असतांना त्यांनी शिंदे ऐवजी खडसे असा उल्लेख केला होता.
आडनावात चुकी झाल्याचे लक्षात येताच नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा उल्लेख करत त्यांनी चुकीची दुरुस्ती केली. गावीत यांनी मात्र खडसे यांच्या आडनावाचा उच्चार केल्याने कार्यक्रमात कुजबूज सुरू झाली होती.