निळ्या रंगाच्या मेल-एक्सप्रेसचा प्रवास म्हणजे जिवंत बॉम्बच!आयसीएफच्या पॅण्ट्रीमधून गॅस शेगडी हद्दपार

आयसीएफच्या पारंपरिक कोचमध्ये अजूनही पॅण्ट्री कारमध्ये गॅसच्या शेगड्या वापरात असल्याचे भयानक चित्र आहे. गॅस सिलिंडरची वाहतूक करण्यास सक्त मनाई असताना रेल्वेच स्वतःच्या पॅण्ट्री कारमधून सिलिंडरची वाहतूक करीत असते असे उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा पॅण्ट्री कारमधून गॅस सिलिंडर हटविण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने आयआरसीटीसीला दिले आहेत.

निळ्या रंगाच्या मेल-एक्सप्रेसचा प्रवास म्हणजे जिवंत बॉम्बच!आयसीएफच्या पॅण्ट्रीमधून गॅस शेगडी हद्दपार
आयसीएफच्या पॅण्ट्रीमधून गॅस शेगडी हद्दपार
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 9:33 AM

मुंबई : आयसीएफच्या (ICF) म्हणजे पारंपरिक निळ्या रंगांच्या मेल एक्स्प्रेसच्या (Express) ट्रेनमध्ये – लावणाऱ्या पॅण्ट्री कारमधून गॅस सिलिंडरची वाहतूक होत असल्याने ते आगीला खुले निमंत्रणच असल्याने प्रवाशांच्या जिवाला प्रचंड धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ट्रेनला (Train) वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे आता आयसीएफ कोचमधील पॅण्ट्री कारमधून एलपीजी सिलिंडर हटविण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने आयआरसीटीसीला दिले आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये ट्रेनला आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीएफच्या पारंपरिक कोचमध्ये अजूनही पॅण्ट्री कारमध्ये गॅसच्या शेगड्या वापरात असल्याचे भयानक चित्र आहे. गॅस सिलिंडरची वाहतूक करण्यास सक्त मनाई असताना रेल्वेच स्वतःच्या पॅण्ट्री कारमधून सिलिंडरची वाहतूक करीत असते असे उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा पॅण्ट्री कारमधून गॅस सिलिंडर हटविण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने आयआरसीटीसीला दिले आहेत. मेल-एक्सप्रेसला वारंवार लागणाऱ्या आगींमुळे निर्णय हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

मध्य रेल्वेच्या मोहिमा सुरूच

रेल्वेमध्ये आगीचे प्रकार रोखण्यासाठी धूम्रपान करणाऱ्यांविरोधातही रेल्वेकडून कारवाई सुरू असते, मध्य रेल्वेने अशा एक हजार मोहिमा या आर्थिक वर्षात राबविल्या आहेत. ट्रेनमध्ये धूम्रपान करणाऱ्यांच्या विरोधात आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. तर रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानक परिसरात धूम्रपान करणाऱ्यांना थेट तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्याचादेखील विचार सुरू आहे.

डेक्कन क्वीनमधून प्रेरणा

अलीकडेच डेक्कन क्वीनच्या पारंपरिक एलएचबी डब्यांना सेवेतून हटवून नवीन एलएचबी डबे जोडताना तिची जुनी डायनिंग कारही एलएचबीमध्ये परावर्तित करण्यात आली आहे. या डायनिंग कारमध्ये पॅण्ट्री कार असून त्यात प्रथमच इलेक्ट्रीक इंडक्शन शेगडी वापरण्यात आली आहे. वाढत्या आगी पाहून यापुढे आयसीएफच्या निळ्या डब्यांच्या गाड्यांना जोडणाऱ्या पॅण्ट्री कारमधूनही सिलिंडर हटविण्याचे पत्रक निघाले आहे. प्रवाशांना इंडक्शन गॅस शेगडीवर गरम करून पदार्थ वाढले जाणार आहेत. तसेच चहा बनविण्यासाठी बॉयलरचा उपयोग होत असल्याने चहा कसा गरम करायचा यावर काथ्याकूट सुरू आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.