मुंबईला आतून बाहेरून बदलणारा कोस्टल प्रोजेक्ट कुठपर्यंत आलाय?, वाचा ही बातमी…

मुंबई महापालिकेने सर्वात मोठा प्रकल्प हाती घेतला आहे तो म्हणजे कोस्टल रोड प्रकल्प. शिवसेनेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

मुंबईला आतून बाहेरून बदलणारा कोस्टल प्रोजेक्ट कुठपर्यंत आलाय?, वाचा ही बातमी...
coastal road
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 10:59 AM

मुंबई : मुंबई महापालिकेने सर्वात मोठा प्रकल्प हाती घेतला आहे तो म्हणजे कोस्टल रोड प्रकल्प. प्रिन्सेस स्टिट ब्रिज ते वरळी सिलिंक असा पहिला टप्पा मुंबई महापालिका तयार करत असून यासाठी पालिका 12721 रुपये खर्च करणार आहे.  कोस्टल रोडच आता वेगाने सुरू असून आतापर्यंत 1281 कोटी खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे. (BMC Commissioner Iqbal Chahal On Mumbai Coastal Road)

175 एकर अरबी समुद्राखालील जमीनीवर भराव टाकण्यात आला असून अजून 102 एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे असणार असून हे बोगदे खोदण्यासाठी मावळा मशीन आणण्यात आली आहे. पुढील महिन्यात बोगद्याच काम सुरु होईल, असंही चहल यांनी सांगितलं आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाचं काम 17 टक्के सुरु झालं असून जुलै 2023 काम पूर्ण होईल, असा विश्वास आयुक्त चहल यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी पाहता शहरात वाहतुकीच्या नव्या पर्यायांची गरज आहे. त्यानुसार कोस्टल रोड हा मुंबईकरांसाठी वरदान ठरणार असल्याचं चहल म्हणाले.

कोस्टल रोड प्रकल्प काय आहे?

कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली या दरम्यानचा 35. 6 किमी लांबीचा मार्ग आहे. समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून, पूल आणि बोगदा असा हा मार्ग असेल. कोस्टल रोडमुळं प्रवासाच्या वेळेत 70 टक्क्यांची बचत होणार आहे. तर 34 टक्के इंधन वाचणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 12 हजार कोटींपेक्षा अधिक असल्याचंही बोललं जातं.

हा रोड मुंबई शहरातून पश्चिम उपनगरांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यान कोस्टल रोड 9. 98 किमी लांबीचा असणार आहे. कोस्टल रोडवर 1650 वाहनं पार्किंगची सोय असेल. याच्या बांधकामासाठी 4 दशलक्ष मेट्रिक टनचं मटेरियल लागणार आहे. माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार आहेत. कोस्टल रोडमुळं 26 हजार कोटी रुपयांची 90 हेक्टर जमीन खुली होणार आहे. विशेष म्हणजे पुरामध्येही कोस्टल रोडचा वापर शक्य होणार आहे.

कोस्टल रोड कसा असेल, काय वैशिष्ट्य आहेत?

  • साडे सहा किलोमीटरचे बोगदे
  • आठ लेनचा मार्ग, मार्गावर ४ इंटरचेंज
  • सिग्नल फ्री मार्ग
  • 34 % इंधन बचत होणार
  • 1650 वाहन पार्किंगची सोय
  • 4 दशलक्ष मेट्रिक टनच मटेरियल वापरणार
  • माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार
  • 4 वर्षाचा कालावधी
  • 90 हेक्टर ओपन जागा, 26 हजार कोटींची जागा उपलब्ध होणार
  • पुरामध्ये देखील हा मार्ग वापरता येणार

(BMC Commissioner Iqbal Chahal On Mumbai Coastal Road)

संबंधित बातम्या

शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडला सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल, केवळ रस्ताच बांधण्याची अट

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.