मुंबईत 244 ठिकाणी बीएमसीकडून कोरोनाची मोफत चाचणी, दिवाळीच्या तोंडावर निर्णय, सर्वसामान्यांकडून स्वागत

मुंबई महानगरपालिकेद्वारे 244 ठिकाणी कोव्हिडची मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा आजपासून सुरु झाली आहे.

मुंबईत 244 ठिकाणी बीएमसीकडून कोरोनाची मोफत चाचणी, दिवाळीच्या तोंडावर निर्णय, सर्वसामान्यांकडून स्वागत
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 4:58 PM

मुंबई : मुंबई महानगरपालिकेद्वारे 244 ठिकाणी कोव्हिडची मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा आजपासून सुरु झाली आहे. याअंतर्गत महापालिका क्षेत्रात एकूण 300 पेक्षा अधिक ठिकाणी मोफत कोव्हिड चाचणी सुविधा सुरु आहे. दिवाळीच्या तोंडावर सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे. (BMC Decision Free Covid test 244 places)

कोव्हिडची लक्षणे असल्यास आपल्या घराजवळील चाचणीच्या ठिकाणांची माहिती विभागीय हेल्पलाईनद्वारे आणि 1916 या दूरध्वनी क्रमांकाद्वारेही मिळू‌ शकणार आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये आदी प्रकारच्या एकूण 244 ठिकाणी वॉक इन पद्धतीने मोफत वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती बीएमसीचे आरोग्य अधिकारी निलेश पालवे यांनी दिली आहे.

महापालिकाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेमुळे मनपा क्षेत्रात कोव्हिड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची सुविधा 300 पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध झाली असून ज्यामुळे मुंबईकरांना कोव्हिड चाचणी अधिक सुलभतेने करण्याचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

सध्या सुरुवातीला दररोज सकाळी 10 ते 12 या कालावधीदरम्यान सदर 244 ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा ‘वॉक इन’ पद्धतीने उपलब्ध असणार आहे. यापैकी काही ठिकाणी आर.टी.पी.सी.आर. पद्धतीची वैद्यकीय चाचणी तर उर्वरित ठिकाणी अँटीजन (Antigen) आधारित वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असणार आहे.

महानगरपालिकेच्या अखत्यारीतील 244 ठिकाणांव्यतिरिक्त, महापालिका क्षेत्रातील 54 खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्येही या आधीपासूनच कोव्हिड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा सशुल्क स्वरूपात उपलब्ध आहे. यासाठी सुधारित शासकीय दरांनुसार घरी येऊन वैद्यकीय चाचणी करण्यासाठी रुपये 1800 रुपये तर वैद्यकीय प्रयोगशाळेत जाऊन चाचणी करवून घेण्यासाठी 1400 रुपये एवढे शुल्क आहे.

(BMC Decision Free Covid test 244 places)

संबंधित बातम्या

मुंबईत 244 ठिकाणी बीएमसीकडून कोरोनाची मोफत चाचणी, कुठे-कुठे सुविधा?

राज्यातील कोरोना चाचणीच्या दरात कपात, नवी किंमत किती?

मुंबईत आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात, निदान लवकर करणं शक्य

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.