Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पालिका काबिज करण्यासाठी भाजपचा प्लान काय, मराठी कट्टा बीजेपीला तारणार?

तब्बल 82 हजार कोटींच्या ठेवी, 30 हजार कोटींचा अर्थसंकल्प आणि एका राज्याएवढे महत्त्व असणाऱ्या मुंबई महापालिकेवर गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता अबाधित आहे. मात्र, आता भाजपने ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी आकाश-पाताळ एक केले आहे. त्यामुळे राज्यभरात राजकीय आरोप-प्रत्योरांपाची राळ उडालेली दिसतेय.

मुंबई पालिका काबिज करण्यासाठी भाजपचा प्लान काय, मराठी कट्टा बीजेपीला तारणार?
उत्तर प्रदेशात भाजपाची मुसंडी, महाराष्ट्रातलं ठाकरे सरकारवर संकट? बीएमसीचेही गणित बदलणार?
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 7:07 AM

मुंबईः तब्बल 82 हजार कोटींच्या ठेवी, 30 हजार कोटींचा अर्थसंकल्प आणि एका राज्याएवढे महत्त्व असणाऱ्या मुंबई (Mumbai) महापालिकेवर गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेची (Shiv Sena) सत्ता अबाधित आहे. मात्र, आता भाजपने (BJP) ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी आकाश-पाताळ एक केले आहे. चक्क 100 जागा जिंकण्याचा निर्धार पक्षाने केला असून, त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या साऱ्या नीतीचा अवलंब करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळेच अजून होळी लांब असूनही गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि अर्वाच्य भाषेत शिमगा सुरू असल्याचे दिसते आहे. येणाऱ्या काळात अजून राजकीय वर्तनाची पातळी खालावली गेली, तरी सुद्धा आश्चर्य वाटू देऊ नका. फक्त असे समजा की, मुंबई महापालिकेची निवडणूक अटीतटीची होणारय.

राणेंपासून श्रीगणेशा…

मुंबई महापालिकेवर ज्याची पकड त्याचे पारडे नेहमी जड मानले जाते. त्यामुळेच महापालिका काबिज करण्यासाठी भाजपने मिशन मुंबई महापालिका सुरू केले आहे. त्याचा श्रीगणेशा नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद देऊन करण्यात आला. त्याची चुणूक आपण पाहिलीच. शिवसेना विरुद्ध राणे असा रंगलेला सामना. खरे तर शिवसेनेला भिडण्यासाठी राणेंना पुढे करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री म्हणून पहिल्यांदा राज्यात आल्यानंतर राणेंनी आपली जनआशीर्वाद यात्रा थेट मुंबईतून सुरू केली. मुंबई महापालिका येत्या काळात काबीज करण्याचा दावा करत शिवसेनेला ओपन चॅलेंजही दिले.

संघटनात्मक बांधणी

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेने घोषणांचा सपाटा लावला. त्यात 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांची मालमत्ता करमाफी त्यासाठीच करण्यात आली. शिवाय महापालिकेच्या अर्थसंकल्पातही त्याची कसर भरून काढली. तर दुसरीकडे शिवसेनेला उत्तर देण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केलीय. सध्या भाजच्या मुंबई अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा आहेत. तर तरुण तडफदार आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजप मुंबई महापालिकेची निवडणूक लढणार आहे. त्यासाठी संघटनात्मक बांधणी पक्की करण्यात आलीय. 25 समित्यांची नियुक्ती केलीय. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करून या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. निवडणूक समित्यांमध्ये खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, मनोज कोटक, किरीट सोमय्या असे धुरीन विशेष आमंत्रित आहे. सोबतीला अतुल भातखळांसारखा आक्रमक चेहरा आहेच.

भ्रष्टाचारावरून दोन हात

मुंबई महापालिकेच्या गेली निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप अशीच रंगली होती. यंदा मुंबईतल्या वॉर्डाची संख्या 227 वरुन 236 पर्यंत वाढली. या निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी भाजपला शंभरहून जास्त नगरसेवक निवडून आणणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजपने आवश्यक ती रणनीती आखली आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारात मुख्य बनविण्याचे ठरवले. त्याचेच फटाके सध्याही फुटतायत. मग ते किरीट सोमय्यांनी केलेले आरोप असोत, की आणखी काही. शिवसेनेच्या साऱ्या प्रकरणांची सखोल माहिती घेऊन ठेवण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यातील एकेक प्रकरणे अजून बाहेर येण्याची शक्यताय.

नाराजांना केले खूश

भाजपमध्ये 2019 मध्ये काही विद्यमान आमदारांची तिकीटे कापली होती. त्यात विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांची नावे होती. यातील एकेकांचे पुनर्वसन करायला केव्हाच सुरुवात केली आहे. तावडे यांना भाजपने थेट राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नियुक्ती दिलीय. हे भाजपमधील मोठे पद आहे. याचा फायदा त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत होऊ शकतो. चंद्रशेखर बावनकुळे यांचेही भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेत उमेदवारी देऊन पुनर्वसन केले. येणाऱ्या काळात गुजराती मते पाहता मेहतांनाही जवळ केले जाऊ शकते.

उत्तर भारतीय जवळ

मुंबईत उत्तर भारतीयांची मते मोठी आहेत. त्यासाठी भाजपने उत्तर भारतीयांना जवळ करणे सुरू केले आहे. आधी मुंबईत काँग्रेसकडून उत्तर भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह सध्या भाजपमध्ये आहेत. विशेष म्हणजे या कृपाशंकर सिंहाच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात भाजपने कधीकाळी रणशिंग फुंकलेले. त्यात राजहंस हे काँग्रेसमध्ये असताना विरोधी पक्षनेते होते. त्यांचा मुंबईच्या राजकारणाचा चांगलाच अभ्यास आहे. त्यांनाही महापालिकेच्या तोंडावर विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

मराठी कट्टा अन् मित्रपक्ष

भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा इतक्या दिवस व्हायची. मात्र, सध्या तरी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी या पक्षात युती होणार असल्याची शक्यता फेटाळून लावलीय. त्यामुळे भाजपच्या साथीला रिपाइं, शिवसंग्राम, रासप हे छोटे पक्ष असू शकतात. शिवाय भाजपने उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मुंबईत ‘चौपाल’ सुरू केले आहेत. तर मराठी मतदारांना खेचण्यसाठी भाजपने ‘मराठी कट्टा’ सुरू केला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी मतदार भाजपशी जोडला जाण्यास मदत होणार आहे. मात्र, हे ही तितकेच खरे की. ही निवडणूक एकतर्फी होणार नाही. सामना असा रंगेल की, भलेभले सुद्धा चक्रावून जातील. कारण फक्त नाव एकच नाव काफीय. ते म्हणजे मायानगरी मुंबई. पाहूया काय होतेय ते…!

इतर बातम्याः

अर्थमंत्री विरुद्ध ऊर्जामंत्री वादाचा 2 लाख 50 हजार उद्योजकांना फटका, या अधिवेशनात तरी तोडगा निघणार का?

नाशिकचे संमेलन फक्त भुजबळांचे, पंचतारांकितच्या भपक्यात धोरणाचा बळी; ठाले-पाटलांचे ताशेरे

युक्रेनहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही, पंतप्रधानांशी बोलणार; मंत्री देशमुखांची ग्वाही

आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.