मुंबईत 244 ठिकाणी बीएमसीकडून कोरोनाची मोफत चाचणी, कुठे-कुठे सुविधा?

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये इत्यादी प्रकारच्या एकूण 244 ठिकाणी मोफत कोरोना वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुंबईत 244 ठिकाणी बीएमसीकडून कोरोनाची मोफत चाचणी, कुठे-कुठे सुविधा?
मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 7:11 PM

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संभाव्य कोव्हिड संसर्गावर अधिकाधिक प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य व्हावे यासाठी मनपा जोरदार प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासूनच्या काळात अधिकाधिक चाचण्या व्हाव्यात यासाठी महापालिका अटोकाट प्रयत्न करत आहे. याच उपाययोजनांचा भाग म्हणून उद्यापासून म्हणजेच 2 नोव्हेंबर पासून मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये इत्यादी प्रकारच्या एकूण 244 ठिकाणी मोफत कोरोना वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. (BMC take a Decision free Covid test 244 Places)

महापालिकाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेमुळे मनपा क्षेत्रात कोव्हिड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची सुविधा 300 पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध झाली असून ज्यामुळे मुंबईकरांना कोव्हिड चाचणी अधिक सुलभतेने करण्याचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 24 विभागांमध्ये 244 ठिकाणी कोव्हिड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या 244 ठिकाणांच्या पत्त्यांची यादी विभागनिहाय नियंत्रण कक्षांद्वारे आणि महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या क्रमांकाद्वारेही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे http://stopcoronavirus.mcgm.gov.in या स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेल्या समर्पित संकेतस्थळावर देखील ही माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे संभाव्य रुग्ण महापालिकेच्या ज्या विभागात रहात असेल, त्याच्या घराजवळ असणाऱ्या ठिकाणांची माहिती, ही विभागीय नियंत्रण कक्षांच्या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा 1916 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर उपलब्ध होणार आहे.

तसेच यासाठी संकेतस्थळाचा पर्याय देखील उपलब्ध आहे. यामुळे मुंबईकरांना आपल्या घरालगतच्या परिसरात कोविड विषयक वैद्यकीय चाचणी आता अधिक सुलभतेने व मोफत करवून घेता येणे शक्य होणार आहे.

सध्या सुरुवातीला दररोज सकाळी 10 ते 12 या कालावधीदरम्यान सदर 244 ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा ‘वॉक इन’ पद्धतीने उपलब्ध असणार आहे. यापैकी काही ठिकाणी आर.टी.पी.सी.आर. पद्धतीची वैद्यकीय चाचणी तर उर्वरित ठिकाणी अँटीजन (Antigen) आधारित वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असणार आहे.

महानगरपालिकेच्या अखत्यारीतील 244 ठिकाणांव्यतिरिक्त, महापालिका क्षेत्रातील 54 खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्येही या आधीपासूनच कोव्हिड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा सशुल्क स्वरूपात उपलब्ध आहे. यासाठी सुधारित शासकीय दरांनुसार घरी येऊन वैद्यकीय चाचणी करण्यासाठी रुपये 1800 रुपये तर वैद्यकीय प्रयोगशाळेत जाऊन चाचणी करवून घेण्यासाठी 1400 रुपये एवढे शुल्क आहे.

(BMC take a Decision free Covid test 244 Places)

संबंधित बातम्या

राज्यातील कोरोना चाचणीच्या दरात कपात, नवी किंमत किती?

मुंबईत आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात, निदान लवकर करणं शक्य

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.