अण्णासाहेब पाटील महामंडळाचं संचालक मंडळ बरखास्त केल्याचं वाईट वाटलं; नरेंद्र पाटील नाराज
अशोक चव्हाण यांच्याबद्दल मी स्पष्ट बोललो, पण मी त्यांचा राजकीय विरोधक नाही," असेही नरेंद्र पाटील यांनी सांगितले. (Narendra Patil On Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal)
मुंबई : “अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळ जेव्हा सरकारने बरखास्त केले, त्याबद्दल मला वाईट वाटले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो,” अशी प्रतिक्रिया आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. “मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याबद्दल मी स्पष्ट बोललो, पण मी त्यांचा राजकीय विरोधक नाही,” असेही नरेंद्र पाटील यांनी सांगितले. (Narendra Patil On Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal)
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त करण्याचा मोठा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारनं घेतला आहे. त्यावर बोलताना नरेंद्र पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी या महामंडळाला राज्य सरकारकडून आर्थिक भांडवल मिळवून दिले. या महामंडळात भ्रष्टाचार होऊ नये यासाठी फडणवीसांनी अशाप्रकारची घटना तयार केली होती. त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज मिळावं असे सांगितलं होतं,” असेही नरेंद्र पाटील म्हणाले.
“माझी नियुक्ती 4 सप्टेंबर 2018 ला झाली होती. या महामंडळाचा कारभार मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले. यासाठी 61 कोटीचा व्याज परतावा महमंडळाने दिला आहे. ऑफिस कार्यालयात न बसता आम्ही जिल्हा आणि तालुका दौरे केले. लोकांच्या मागण्या ऐकल्या. जवळपास 23 जिल्ह्यात दौरे केले. या महामंडळाची व्याप्ती आम्ही ग्रामीण भागात जाऊन प्रश्न समजून केली आहे,” असेही नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव भूषण गगराणीकडे मी माझा राजीनामा दिला. स्वाभिमानी व्यक्ती म्हणून मी राजीनामा दिला. नागपूर अधिवेशनात मला बोलवून घेतलं आणि आढावा घेऊन पुन्हा अध्यक्ष केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः महामंडळाच्या पाठीशी उभे राहतील अस सांगण्यात आले. यासाठी आम्ही पुन्हा दौरे सुरु केले,” असेही ते म्हणाले.
“पण जेव्हा हे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं तेव्हा मला वाईटही वाटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुद्धा साथ दिली. पण आता संचालक मंडळ जेव्हा बरखास्त केले, त्याबद्दल वाईट वाटले. पण त्यांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो,” असेही त्यांनी सांगितले.
“मराठा आरक्षणाला 9 सप्टेंबर 2020 ला सुप्रीम कोर्टाची स्थगिती मिळाली आहे. अशोक चव्हाण यांची बदली करण्यात यावी आणि त्या महामंडळाचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांना करावं ही मागणी मी करत होतो. अशोक चव्हाण यांच्याबद्दल मी स्पष्ट बोललो. मी त्यांचा राजकीय विरोधक नाही. मी कधीही नांदेडलाही गेलो नाही,” असेही नरेंद्र पाटील स्पष्ट केले.
“अशोक चव्हाणांना सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडता आली नाही. या भाषणात माझा तोल जाणं स्वाभाविक आहे. एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाची माहिती आहे. मागील सरकारमध्येही ते समितीतही सहभागी होते. त्यांना अनेक गोष्टी माहिती आहेत. मी सरकारवर कधीही टीका केली नाही,” असेही ते म्हणाले. (Narendra Patil On Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal)
संबंधित बातम्या :
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय