अलिबागच्या समुद्रात थरार, अचानक बोट उलटली, 15 ते 20 तरुणाचं काय झालं ?
अलिबाग तालुक्यात एक थरकाप उडवणारी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. खवळलेल्या समुद्रात प्रवाशांनी भरलेली एक बोट पलटी झाली आणि बघणाऱ्यांच्या हृदयाचा थरकाप उडाला. रविवार, 31 मार्च रोजी खांदेरी किल्ल्यावर गेलेले तरूण किनाऱ्यावर परत येणाऱ्या तरूणांची ही बोट अचानक पाण्यात पलटली.
अलिबाग तालुक्यात एक थरकाप उडवणारी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. खवळलेल्या समुद्रात प्रवाशांनी भरलेली एक बोट पलटी झाली आणि बघणाऱ्यांच्या हृदयाचा थरकाप उडाला. रविवार, 31 मार्च रोजी खांदेरी किल्ल्यावर गेलेले तरूण किनाऱ्यावर परत येणाऱ्या तरूणांची ही बोट अचानक पाण्यात पलटली आणि भीषण दुर्घटना घडली. त्यावेळी बोटीत 15-20 तरूण होते. मात्र सुदैवाने यात कोणतीच जीवितहानी झाली नाही. बोटीतील सर्व प्रवासी, तरूण किनाऱ्यावर सुखरूप परतले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 मार्च, रविवारी काही तरूण हे खांदेरी किल्ल्यावर गेले होते. त्या किल्ल्यावरील जागृत वेताळ देवाला मान देऊन तरूण किनाऱ्यावर परत येत असतानाच अचानक खवळलेल्या समुद्रात त्यांची बोट पलटली.
या बोटीत असलेले 15 ते 20 तरूण हे साखर-आक्षी येथील असल्याचे समजते. त्यांची बोट साखरपट्टी या ठिकाणी किनाऱ्यावर येताना काहीच अंतर उरले असतानाच ही भीषण दुर्घटना घडली. बोट पलटली आणि तरूण पाण्यात पडले.
मात्र सुदैवाने यातच कोणतीच जीवितहानी झाली नाही वा कोणीही जखमी झाले नाही. बोटीतील सर्व तरूण सुखरूपरित्या किनाऱ्यावर परतले आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
अलिबागच्या खांदेरी किल्ल्यावर वेताळ देवाचे जागृत देवस्थान आहे. येथे मान द्यायला अनेक नागरिक आणि तरुण जात असतात. खांदेरी किल्ल्यावरून परतताना समुद्राला बोटीने ३ प्रदक्षिणा घालायची पूर्वापार परंपरा आहे.
हीच परंपरा जोपासत असताना बोटीतील तरुणांच्या २ प्रदक्षिणा पूर्ण झाल्या मात्र तिसऱ्या प्रदक्षिणेच्या दरम्यान वेगाने उसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे बोट अनियंत्रित झाली. आणि 15 ते 20 तरुणांसह ती बोट पाण्यात उलटली. सुदैवाने सर्वच तरुण पट्टीचे पोहणारे असल्याने त्यांनी तात्काळ समुद्रकिनारा गाठला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.