Ratnagiri : रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाली, तिघांना वाचवण्यात यश, दोन खलाशी बेपत्ता

Ratnagiri रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर एकूण पाच जण हेते. त्यापैकी तिंघाना वाचवण्यात यश आलं आहे. तर दोन जण अद्यापही बेपत्ता आहे.

Ratnagiri : रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाली, तिघांना वाचवण्यात यश, दोन खलाशी बेपत्ता
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 11:31 AM

रत्नागिरी : रत्नागिरीच्या (Ratnagiri) भाट्ये समुद्रात बोट (boat) बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर एकूण पाच जण हेते. त्यापैकी तिंघाना वाचवण्यात यश आलं आहे. तर दोन जण अद्यापही बेपत्ता आहेत. या दोघांचा शोध सुरू असून, ही बोट नेमकी कशी बुडाली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. छोट्या बोटीवर हे पाच जण मासेमारी करण्यासाठी निघाले होते. मासेमारीसाठी समुद्रात गेले. मात्र त्यानंतर अचानक ही बोट बुडाली. दरम्यान या पाच पैकी तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अद्यापही यातील दोन जण बेपत्ता आहे. बेपत्ता खलाशांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ही बोट समुद्रात कशी बुडाली याबाबत माहिती समोर आलेली नाही . रेस्क्यू ऑपरेशन (Rescue operation) राबवत तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पाच जण मासेमारीसाठी रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात उतरले होते. एका छोट्या बोटीच्या मदतीने मासेमारी सुरू होती. मासेमारी सुरू असतानाच अचानक ही बोट बुडाली.  घटना लक्षात आल्यानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. या बोटीमध्ये एकूण पाच जण होते, त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. तर अद्यापही दोन जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र अद्याप तरी त्यांचा काहीही ठावठिकाणा लागू  शकलेला नाही. ही बोट नेमकी कशी  बुडाली याची देखील माहिती समोर आलेली नाहीये. सध्या बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

पावसाळ्यात समुद्र बनतात धोकादायक

दरम्यान पावसाळ्यात समुद्र धोकादायक बनतात. वादळाची शक्यता असते. वादळामुळे अजस्त्र लाटा उसळतात. सध्या बंगाच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर वादळात झालेले आहे. याच पार्श्वभूमीर राज्यात शनिवारपासून तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. नदी काठच्या गावांना तसेच खोल समुद्रात मासेमरी करण्यासाठी जाणाऱ्या मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.