धाडसाला सलाम ! पोलीस ठरले देवदूत… बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी महिला पोलिसाची नदीत उडी

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे पोलिसांचे ब्रीदवाक्य, त्याच वाक्याला जागत पोलिस रात्रंदिवस जनतेचा रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. असाच काहीस प्रकार जळगावमध्येही दिसून आला. तेथून एक अनोखी बातमी समोर आली आहे. पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी एक महिला पोलिसाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करत नदीत उडी मारली आणि त्या मुलाचे प्राण वाचवले.

धाडसाला सलाम ! पोलीस ठरले देवदूत... बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी महिला पोलिसाची नदीत उडी
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 8:42 AM

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीदवाक्य, त्याच वाक्याला जागत पोलिस रात्रंदिवस जनतेचा रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. असाच काहीस प्रकार जळगावमध्येही दिसून आला. तेथून एक अनोखी बातमी समोर आली आहे. पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी एक महिला पोलिसाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करत नदीत उडी मारली आणि त्या मुलाचे प्राण वाचवले. अवघ्या 11 वर्षांचा मुलगा काठावरून पाय घसरून पाण्यात पडला होता. ते पाहून एकच कल्लोळ माजला, वाचवा, वाचवा च्या हाका सुरू झाल्या, मात्र बघ्यांपैकी कोणीच त्याच्या मदतीसाठी धाव घेतली नाही. मात्र तेथेच कर्तव्यावर असलेल्या महिला कॉन्स्टेबलने जीवाची जराही पर्वा न करता नदीच्या पाण्यात धाडकन उडी मारली आणि त्या मुलाचा जीव वाचवला. नदीत बुडणाऱ्या मुलासाठी देवदूत ठरलेल्या कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.

पैसे उचलण्यासाठी गेला आणि पाय घसरून पाण्यात पडला…

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कानळदा येथील गिरणा नदीच्या तीरावर ही घटना घडली. ऋषिपंचमी निमित्त हजारोंच्या संख्येने महर्षी कण्वाश्रमात व नदीकाठावर महिलांची वर्दळ होती. महिला आश्रमाला लागून असलेल्या घाटावर आंघोळ करत असताना एक 11 वर्षीय मुलगा गिरणा नदीपात्रात पूजेचे पैसे उचलण्यासाठी गेला असताना. मात्र तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि तो काठावरून खाली पाण्यात पडला. ते पाहून एकच गोंधळ झाला. मात्र त्याला वाn चवण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही. तेथेच ड्युटीवर तैनात असलेल्या कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी यांनी ही घटना पाहिली. वर्दीवर असतानाही त्यांनी काहीही विचार न करता, जीवाची पर्वा न करता क्षणार्धात गिरणेत उडी घेऊन त्या मुलाला सुखरूप बाहेर काढले.

अचानक हा मुलगा नदी काठावर गेला असताना पाय घसरून पडला व नदीमध्ये बुडू लागला. महिलांनी केलेला आरडाओरडा ऐकून बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी तेथे आल्या. मुलगा पाण्यात बुडत असल्याचे दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अंगावरील वर्दीवरच स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली आणि त्या मुलाला सुखरूप बाहेर काढत त्याचे प्राण वाचविले

याप्रसंगी या महिला कर्मचाऱ्याने दाखवलेल्या धाडसाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी त्यांचा सत्कार करून गौरव केला. महिला व परिसरातील लोकांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.