Dr. Bhimrao Ambedkar 131st birth anniversary Celebration LIVE : बीडमध्ये आंबेडकर जयंतीचा उत्साह
आज महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे जयंती साजरी करण्यासाठी काही मर्यादा आल्या, मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाले असून, राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आज मोठ्या धुमधडाक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे.
आज महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे जयंती साजरी करण्यासाठी काही मर्यादा आल्या, मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाले असून, राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आज मोठ्या धुमधडाक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यरात्री भोईवाडा परळमध्ये शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 131 किलोचा केक कापून बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.
LIVE NEWS & UPDATES
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उस्मानाबादमध्ये मोठ्या उत्साहात साजरी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उस्मानाबादमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरांच्या पुतळा परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. ढोल, ताशांच्या संगतिने महामानवाला अभिवादन करण्यात आले.
-
उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा बाहेर काढणार – किरीट सोमय्या
उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा बाहेर काढणार …. मी नाॅट रिचेबल का झालो होतो त्याचं ऊत्तर देणार…
– एक डजन लोकांची प्राॅपर्टी अटॅच झालीये… अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिकांसहीत त्यांची प्राॅपर्टी जप्त, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अडसुळ आणि इतरांची संपत्ती अटॅच झालीये..
– नियमाप्रमाणे मी किंवा वकिल जाऊ शकतात, आम्ही कोर्टात सगळी माहीती देत आहोत, १९९७ – ९८ पासून विक्रांतची मोहीम सुरू झाली…
– विक्रांतचा कार्यक्रम सिंबाॅलिक होता…
– विक्रांत वाचवण्यासाठी सेनेनं समरिथन दिलं होतं… १९९७ सालापासून सुरवात केलीये… संजय राऊतांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले…
-
-
बाळासाहेब थोरातांनी केले महामानवाला अभिवादन
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बाबासाहेबांना अभिवादन करून पुष्पहार अर्पन केला.
-
बीडमध्ये आंबेडकर जयंतीचा उत्साह
राज्यात गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. कोरोना संंकटामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास मर्यादा आल्या, मात्र आता राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवल्याने राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. बीड जिल्ह्यात देखील मोठ्या धुमधडाक्यात जयंती साजरी करण्यात येत असून, बीडमध्ये महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात गर्दी केल्याचे दिसून येत आहे.
-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून महामानवाला अभिवादन
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह महाविकास आघाडीमधील अनेक नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल
-
-
विजय वडेट्टीवारांकडून बाबासाहेबांना अभिवादन
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे, या निमित्ताने ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दीक्षाभूमी येथे येऊन भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी युथ काँग्रेसच्या नेत्या शिवाणी वडेट्टीवार याही उपस्थित होत्या. शिवाणी वडेट्टीवार यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केलं. “बाबासाहेब यांनी संत तुकाराम महाराज, कबीर आणि महात्मा फुले यांना गुरु मानलं होतं. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर हा देश चालतोय, आणि संविधानामुळेच लोकशाही जीवंत आहे, कुणीही कितीही जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरीही संविधानामुळे हा देश मजबूत आहे” अशी भावना यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. -
सोलापूरमध्ये बाबासाहेबांना अनोखी मानवंदना
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. राज्यभरात जयंतीचा उत्साह दिसून येत आहे. सोलापूरमध्ये अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना अभिवादन करण्यात आले आहे. सोलापूरमध्ये हजारो वही आणि पेनाचा उपयोग करून महामानवाचे चित्र साकारण्यात आले आहे. तब्बल 35 बाय 20 फुटांच्या जागेत बाबासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ही प्रतिमा सर्वांच्या आकर्षनाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
-
राज्यभरात आंबेडकर जयंतीचा उत्साह, विविध कार्यक्रमांचे आयोजन
राज्यभरात आंबेडकर जयंतीचा उत्साह, विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबईतील चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी गर्दी
नागपूरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
औरंगाबादमध्ये आंबेडकर जयंती वर्गणीमुक्त करण्याचा संकल्प
-
तीन हजार पुस्तकातून साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चांदवड येथील कलाशिक्षक देव हिरे यांनी अनोख्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. त्यांनी तब्बल तीन हजार पुस्तकांचा वापर करून बाबासाहेंबाची प्रतिकृती साकारली आहे.
-
औरंगाबादेत ‘वर्गणीमुक्त जयंती’
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती औरंगाबादकरांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा औरंगाबादेत आंबेडकर जयंतीसाठी कोणतीही वर्गणी घेण्यात येणार नसून, वर्गमुक्त जयंती साजरी करण्यात येणार आहे.
-
Ambedkar Jayanti 2022 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर दाखल
आज महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.
-
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती; नागपूरच्या दिक्षाभूमीवर गर्दी
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती
नागपूरच्या दिक्षाभूमीवर सकाळपासून बौद्ध अनुयायांची गर्दी
दोन वर्षानंतर दिक्षाभूमीवर डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे
नागपूरसह परिसरातील बौद्ध अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दिक्षाभूमीवर
Published On - Apr 14,2022 7:37 AM