BREAKING : चंद्रपुरात मोठी दुर्घटना, 60 फूट उंचीवरुन रेल्वे रुळावर 20 जण पडले, 8 जण गंभीर

चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पुलावरील स्लॅब कोसळल्याची दुर्देवी घटना समोर आलीय.

BREAKING : चंद्रपुरात मोठी दुर्घटना, 60 फूट उंचीवरुन रेल्वे रुळावर 20 जण पडले, 8 जण गंभीर
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 7:02 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पुलावरील स्लॅब कोसळल्याची दुर्देवी घटना समोर आलीय. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. त्यापैकी आठ जणांची प्रकृीत गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरहेड वायरचा स्पर्श झाल्याने काही प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच प्रवासी हे 60 फूट उंचीवरुन थेट रेल्वे रुळावर कोसळले आहेत. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडालीय.

मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर रेल्वे स्थानकावर काजीपेट पुणे एक्सप्रेस पकडण्यासाठी अनेक प्रवासी हे पहिल्या क्रमांच्या प्लॅटफॉर्मवरुन चौथ्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर जात होते. या दरम्यान प्रवाशांची गर्दी जास्त असल्याने पुलाचा भाग कोसळला. विशेष म्हणजे संबंधित दुर्घटना घडली तेव्हा पुलावर तब्बल 80 जण होते.

हे सुद्धा वाचा

पुलाचा स्लॅब खाली कोसळला. गर्दी जास्त असल्याने संबंधित घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जखमी प्रवाशांना तातडीने बाजूला करण्यात आलं. त्यांना लगेच रुग्णालयात पाठवण्यात आलं.

दरम्यान, पुलाचा स्लॅब कोसळल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पुलाचा आज स्लॅब कोसळलाय, पूल कोसळला असता तर किती मोठं नुकसान झालं असतं? असा प्रश्न उपस्थित होतोय.

संबंधित घटनेवर रेल्वे पोलीस आणि प्रशासनाकडून सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का बसलाय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.