VIDEO | माजी मंत्र्याच्या मुलीच्या हातात झाडू, राज्यमंत्र्याच्या मुलाने उचलल्या गाद्या; कोरोना रुग्णांसाठी मंत्र्यांची मुलं सरसावली
अंकिता पाटील व श्रीराज भरणे या दोघांनी नव्याने राजकारणात येणाऱ्या युवकांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. (Broom in the hands of the daughter of a former minister, cushions picked up by the son of a minister of state; The children of the minister rushed for the corona patients)
इंदापूर : देशात कोरोनाचे भलतेच टेन्शन वाढले आहे. रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे कि त्यांना वाचवण्यासाठी, त्यांची उपचार सेवा करण्यात यंत्रणा कमी पडली आहे. एकीकडे डॉक्टर ‘देव’ बनून अहोरात्र सेवा करताहेत, दुसरीकडे आरोग्य खात्यातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन आता देशभरातून हजारो हात रुग्णसेवेसाठी पुढे आले आहेत. पुण्यातही अशाच सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय येत आहे. शुक्रवारी यात मंत्र्यांच्या मुलांची आघाडी दिसली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांच्या सेवेसाठी एकीकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिताने परिसर स्वच्छतेसाठी हातात झाडू घेतली, तर दुसरीकडे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज यांनी कोरोना रुग्णांच्या बेडवर गाड्या अंथरल्या. दोघांचा हा पुढाकार इंदापूरसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात कौतुकाचा विषय बनला आहे. (Broom in the hands of the daughter of a former minister, cushions picked up by the son of a minister of state; The children of the minister rushed for the corona patients)
अंकिता पाटील यांनी हातात घेतला झाडू
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सुकन्या अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्यांनी आज इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांना परिसरात अस्वच्छता दिसली. कोरोना प्रसाराला ही अस्वच्छता कारणीभूत ठरू शकते, या विचाराने अंकिता यांनी तिथल्या कुणा कार्यकर्त्याला किंवा शासकीय कर्मचाऱ्याला सूचना करत न बसता स्वतः हातात झाडू घेतली आणि रुग्णालय परिसर स्वच्छ केला.
श्रीराज भरणेंनी उचलल्या गाद्या
दुसरा किस्सा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांचा आहे. इंदापुरात व्ही. पी. कॉलेज येथे 100 बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरु आहे. श्रीराज भरणे यांनी स्वतः गाद्या उचलत त्या कोवीड केअर सेंटरमध्ये नेऊन तेथील बेडवर ठेवल्या. मंत्र्याचा मुलगा असल्याचा कुठला अविर्भाव न दाखवता त्यांनी हे काम केले. कोविड सेंटरमधील अनेक बेडवर त्यांनी स्वत: गाद्या अंथरल्या. या कामात त्यांनी स्वतःला झोकून देऊन कोरोनाच्या लढ्यात योगदान दिले. त्यांचे हे कार्य तेथील उपस्थितांना थक्क करायला लावणारे होते. श्रीराज यांचा हा पुढाकार पाहून उपस्थित इतर मान्यवरांनीही कोविड सेंटरमध्ये शक्य ती सेवा करण्यास सुरुवात केली. तहसीलदार अनिल ठोंबरे यांनीदेखील काही गाद्या उचलून बेडवर अंथरल्या.
अंकिता पाटील व श्रीराज भरणे या दोघांनी नव्याने राजकारणात येणाऱ्या युवकांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. राजकारण्यांनी फक्त राजकारण न करता आणि एकमेकांना दोष न देता स्वतः फिल्डवर उतरुन कार्य केले पाहिजे, हाच संदेश दोघांच्या कृतीतून समाजापुढे आला आहे.
राज्यात 24 तासात कोरोनाने 773 रुग्ण दगावले
राज्यात गेल्या 24 तासात 66,836 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासात 773 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 74, 045 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या एकूण 34,04,792 झाली आहे. राज्यात सध्या एकूण 6,99,858 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.34% झाले आहे. राज्यात सध्या 41, 88, 266 लोक होम क्वॉरंटाईन आहेत. तर 29, 378 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर मुंबईत गेल्या 24 तासांत 7199 आढळले असून रुग्णांची एकूण संख्या 6, 16, 279 वर गेली आहे. तसेच मुंबईत एकूण 72 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची एकूण संख्या 12,655 वर गेली आहे. (Broom in the hands of the daughter of a former minister, cushions picked up by the son of a minister of state; The children of the minister rushed for the corona patients)
इतर बातम्या
केंद्राला 150 रुपयात आणि राज्याला 400 रुपयांना, कोरोना लसीच्या दरात दुजाभाव का? : अशोक चव्हाण