Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्पाकडून राज्याच्या आरोग्य विभागाला मोठ्या अपेक्षा, राजेश टोपेंची मागणी काय?
समाजातील विविध घटकांना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहे. त्यातच मागील दोन वर्षापासून संपूर्ण जगासह देशात कोरोनाचं संकट घोंघावत आहे. अशावेळी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद करण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही केंद्राकडे महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. ते आज जालना इथं बोलत होते.
जालना : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) उद्या सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) या उद्या अर्थात 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदेचं 2022 चं अर्थसंकल्पीय आंदोलन आजपासून सुरु झालं आहे. हे अधिवेशन 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. दरम्यान, मध्ये एक महिना सुट्टी असेल. त्यानुसार सत्राचा पहिला भाग 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी असा असेल. पुढे महिनाभराच्या विश्रांतीनंतर सत्राचा दुसरा भाग 14 मार्चपासून सुरु होऊन 8 एप्रिलला संपणार आहे. अशावेळी समाजातील विविध घटकांना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहे. त्यातच मागील दोन वर्षापासून संपूर्ण जगासह देशात कोरोनाचं संकट घोंघावत आहे. अशावेळी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद करण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही केंद्राकडे महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. ते आज जालना इथं बोलत होते.
केंद्राचा अर्थसंकल्प उद्यापासून सुरू होत आहे. या अर्थसंकल्पात राज्याच्या आरोग्य विभागाला झुकतं माप देऊन जास्तीचा निधी उपलब्ध करून द्यावा. केंद्रीय पुरस्कृत मेडिकल कॉलेज मंजूर करून देण्यात द्यावेत. दवाखाना बांधकाम निधी उपलब्ध करून देण्यात यावा. राष्ट्रीय आरोग्य मिशनसाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना लस ही फक्त कोरोनावरच नाही, तर अन्य 21 प्रकारच्या आजारांसाठी लाभदायक असल्याची माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या या माहितीबाबत सर्वसाधारण लोकांमध्ये जनजागृती करू आणि जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे असं आवाहन करणार असल्याचंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.
विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाला सहकार्य करावं – टोपे
दुसरीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या आणि परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. त्याबाबत विचारलं असता. दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या निर्णयाला विरोध केला असून ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलीय. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली आहेत. मात्र विद्यार्थ्यानी आंदोलनं न करता शिक्षण विभागाला सहकार्य करावं, असं आवाहन टोपे यांनी केलंय.
‘वाईन हानीकारक, पण निर्णय शेतीच्या दृष्टीने’
त्याचबरोबर राज्य सरकारच्या वाईनबाबतच्या निर्णयावरही राजेश टोपे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वाईन ही आरोग्यासाठी घातकंच आहे. पण राज्य सरकारने वाईन विक्री बाबत घेतलेला निर्णय हा शेतीच्या दृष्टीने बघावा असं आवाहन त्यांनी केलं. वाईन आणि गांजाची तुलना होऊ शकत नाही. त्यामूळे कुणीही अशी तुलना करू नये असंही टोपे यावेळी म्हणाले.
इतर बातम्या :