Borivali | माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार, भिंत रचून कुत्र्यांना जिवंत गाडलं

Borivali | माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार, भिंत रचून कुत्र्यांना जिवंत गाडलं

| Updated on: Mar 29, 2022 | 4:48 PM

मुंबईच्या (Mumbai) बोरिवली (Borivali) पश्चिममध्ये माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. अँक्लीविरा ग्रँडच्या पार्किंगच्या बाजूच्या मोकळ्या जागेत भिंत रचून त्या कुत्र्यांना (Dogs) जिवंत गाडून टाकण्यात आले होते. प्राणी प्रेमींनी सर्व कुत्र्यांना बाहेर सुखरूप काढले.

मुंबईच्या (Mumbai) बोरिवली (Borivali) पश्चिममध्ये माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. बोरिवलीच्या विसी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पौर्णिमा शेट्टी दररोज जवळपास बोरिवली पश्चिमेत 300 भटक्या कुत्र्यांना आणि मांजरीला जेवण देतात. मात्र बोरीवली येथील देविदास लेनवरील दररोज देणाऱ्या कुत्र्यांना जेवण देण्यासाठी काल आल्यानंतर त्या ठिकाणी 20 ते 22 कुत्री गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पौर्णिमा यांनी आजूबाजूला पाहणी केली असता अँक्लीविरा ग्रँडच्या पार्किंगच्या बाजूच्या मोकळ्या जागेत भिंत रचून त्या कुत्र्यांना (Dogs) जिवंत गाडून टाकण्यात आले होते. हे लक्षात येतात प्राणी प्रेमींनी हातोड्याच्या सहाय्याने भिंती तोडून सर्व कुत्र्यांना बाहेर सुखरूप काढले. प्राणी प्रेमींनी याविषयी एमएचबी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याविषयी अधिक चौकशी एमएचबी पोलीस करत आहेत.

Published on: Mar 29, 2022 04:46 PM