बुलढाण्यातील रस्त्यावर सोन्याचे मनी, कुणी म्हणतो सोन्याचा पाऊस, तर कुणी म्हणतो चोरांची कृपा!, पाहा नेमकं काय झालं?

डोणगाव येथून जाणाऱ्या औरंगाबाद - नागपूर राज्य महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्स ते मादणी फाट्या परियांत रस्त्याच्या उजव्या बाजूने सोन्याचे मणी पडलेले लोकांच्या नजरेत पडले. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे.

बुलढाण्यातील रस्त्यावर सोन्याचे मनी, कुणी म्हणतो सोन्याचा पाऊस, तर कुणी म्हणतो चोरांची कृपा!, पाहा नेमकं काय झालं?
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 12:39 PM

बुलढाणा :  बुलढाण्यातील (Buldhana) डोणगाव येथून जाणाऱ्या औरंगाबाद-नागपूर राज्य महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्स ते मादणी फाट्या परियांत रस्त्याच्या उजव्या बाजूने सोन्याचे मणी पडलेले लोकांच्या नजरेत पडले. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे. ज्याला मनी दिसले त्यांनी उचलण्यासाठी लगबग केली. त्यामुळे काही वेळ वाहतूक सुद्धा थांबलेली होती. सोन्याच्या मण्याची (Gold Rain) माहिती मिळाल्यावर कित्येकाने रस्त्याच्या कडेला पडलेले मणी पाहण्यासाठी नजर भिरभिरत होती. डोनगाव येथून जाणाऱ्या औरंगाबाद नागपूर राज्य महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्स पासून ते मांदणी फाट्यापर्यंत मोटारसायकल स्वार, आजूबाजूचे दुकानदार,रस्त्याने जाणारे पदाचारी हे सोन्याच्या मण्यांचे लाभार्थी ठरले. जो तो मणी उचलून खिशात टाकून पुढचे मणी उचलण्याच्या नादात होता यात कोणाला कोणाचा धक्का लागला तर कोणी कोणाला आवाज देऊन मणी उचलण्याचा साठी सांगत होता , हा प्रकार सुमारे 15 ते 20 मिनिटे चालला सोन्याचे मणी सापडत आहेत ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने त परिसरातील बाया माणसे यांनी सुद्धा गर्दी केली होती.

रस्त्याने जाणाऱ्या मोटारसायकल स्वारांनी देखील गाडी थांबवून मणी वेचने सुरू केले या धावपळीला पाहता काहीकाळ महामार्गावरील वाहतूक सुद्धा थांबलेली होती. सोन्याचे मणी पाहून यावर मंथन सुरू झाले कोणी म्हणत की मोटारसायकल वरून महिला चालली असेल तिच्या गळयात असलेली एकदानी पोथ तुटून पडली असेल तर काहींनी चोरट्यानी पोलिसांच्या धाकाने कोणी सोन्याचे मणी फेकून दिले असतील असे विविध तर्क वितर्क लावत होते.

हे सुद्धा वाचा

काहींनी मणी फोडून पाहिल्यावर तो चापट न होता सरळ फुटून तुकडे तुकडे झाले ज्याने सापडलेले मणी सोन्याचे नव्हते तर सोन्या सारखे दिसणारे नकली होते, याची खात्री पटली जीवाचे हाल करून मणी वेचणाऱ्याना स्वतावरच हसू यायला लागलेलं होत ज्यांनी ज्यांनी माणिवेचले त्यांनी अलगद बाजूला टाकून दिले कोणाला माहीत पडल्यावर ते आपल्यावर हसतील याची काळजी त्यांना वाटत होती पण ते मणी कोणी व का फेकले असतील हा प्रश्न अनुत्तरित राहिला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.