Gold Mask | ‘हौसेला मोल नाही’, तब्बल साडे सहा तोळ्याचा सोन्याचा मास्क, किंमत….
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी दीपक वाघ या गोल्ड मॅनने कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क साडेसहा तोळ्याचा सोन्याचा मास्कच बनवून घेतला.
बुलडाणा : सोन्याने 54 हजार 700 रुपये प्रतितोळा भाव गाठला आहे (Buldhana Gold Mask). अशा स्थितीतही चिखली येथील एका व्यक्तीने चक्क साडेसहा तोळ्याचा सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे. त्यामुळे ‘हौसेला मोल नसते’चा प्रत्यय बुलडाण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या काळात बनवलेल्या या सोन्याच्या मास्कमुळे चिखली शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभर चर्चा आहे (Buldhana Gold Mask).
कोरोनामुळे सध्या सर्वत्र मास्क वापरणे बंधनकारक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी दीपक वाघ या गोल्ड मॅनने कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क साडेसहा तोळ्याचा सोन्याचा मास्कच बनवून घेतला.
या मास्कची किंमत अंदाजे 3 लाख 60 हजार रुपये आहे. दीपक वाघ यांना सोन्याची खूप आवड आहे. त्यांचा गळा, हात नेहमीच सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला असतो. कोरोना काळात काही दिवसांपूर्वी माध्यमात आलेल्या बातम्या पाहून आपणही सोन्याचा मास्क तयार करावा, अशी कल्पना सुचली आणि त्यांनी तसा मास्कही तयार करुन घेतला.
यापूर्वी राज्यातील अनेक भागातून सोन्याचा मास्क, चांदीचा मास्क तयार करुन घेतल्याचं समोर आलं आहे. त्याच प्राश्वभूमीवर चिखली येथे वाघ यांनी बनवलेला सोन्याचा मास्क याची चार्चा सध्या संपूर्ण जिल्हाभर होत आहे (Buldhana Gold Mask).
दीपक वाघ यांनी चिखली शहरातल्या आपल्या मित्राच्या दुकानातून हा मास्क तयार करुन घेतला आहे. त्यांचे मित्र प्रसाद काछवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मास्कचं एकूण वजन 65 ग्राम असून आज त्याची किंमत बाजारभावाप्रमाणे जवळपास 3 लाख 70 हजार रुपये किंमत आहे.
मास्क न वापरल्यास 1 लाख रुपयांचा दंड, 2 वर्षांची जेल, झारखंडचा मोठा निर्णयhttps://t.co/pKXiW0pGBQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 23, 2020
Buldhana Gold Mask
संबंधित बातम्या :
Nashik Corona | नाशिकमध्ये संचारबंदीतही नागरिक बेफिकीर, दोन कोटींचा दंड, 17 हजार नागरिकांवर कारवाई