Buldhana Crime : बुलढाण्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; वर्षभरात 15 पिस्टल, 46 जिवंत काडतुसे, 22 तलवारींसह 5 फायटर जप्त

गत वर्षभरात विविध ठिकाणी केलेल्या 6 कारवायांमध्ये देशी बनावटीचे 15 पिस्तुल आणि 46 जिवंत काडतुसे पकडण्यात आली. संग्रामपूर तालुक्यातील वसाळी या आदिवासी दुर्गम भागात तसेच मध्य प्रदेशातील खंडवा, बऱ्हाणपूर, खगणार, पाचोरी भागातून आरोपींना उचलण्यात आले. मोठ्या शिताफीने आरोपींना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून बेकायदा शस्त्रे जप्त करण्यात आली.

Buldhana Crime : बुलढाण्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; वर्षभरात 15 पिस्टल, 46 जिवंत काडतुसे, 22 तलवारींसह 5 फायटर जप्त
बुलढाण्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 7:06 PM

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात मध्य प्रदेशातून वा अन्य ठिकाणांहून अधूनमधून देशी बनावटीच्या पिस्टलची तस्करी (Smuggling) होत असते. मागील वर्षभरात स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्ट्यांच्या तस्करीचे 6 गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये 15 पिस्टल (Pistol) आणि 46 जिवंत काडतुसे (Cartridges) या कारवाईत हस्तगत करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस यांनी गुन्हेगारांना आपल्या सापळ्यात अडकवण्यासाठी विशेष मोहीम आखली. आर्म ॲक्टअंतर्गत कारवाया करण्यासाठी पथके नेमून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क केले.

वर्षभरात केलेल्या कारवायांमध्ये बेकायदा शस्त्रे जप्त

गत वर्षभरात विविध ठिकाणी केलेल्या 6 कारवायांमध्ये देशी बनावटीचे 15 पिस्तुल आणि 46 जिवंत काडतुसे पकडण्यात आली. संग्रामपूर तालुक्यातील वसाळी या आदिवासी दुर्गम भागात तसेच मध्य प्रदेशातील खंडवा, बऱ्हाणपूर, खगणार, पाचोरी भागातून आरोपींना उचलण्यात आले. मोठ्या शिताफीने आरोपींना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून बेकायदा शस्त्रे जप्त करण्यात आली. आर्म ॲक्टअंतर्गत जिल्ह्यात 8 कारवाया करण्यात आल्या. शिवाय बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींकडून 22 तलवारी आणि 5 फायटर जप्त करण्यात आले.

धुळ्यात हरियाणाच्या तरुणाकडून 4 गावाठी पिस्तुले, काडतुस हस्तगत

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावातील बसस्टॅन्ड जवळ चार दिवसांपूर्वी हरियाणाच्या एका तरुणाला गावठी पिस्तुलांसह रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 25 मे रोजी सायंकाळी नरडाणा पोलिसांनी ही कामगिरी केली असून त्याच्याकडून सुमारे 2 लाखाच्या 4 पिस्टल आणि काडतूसे हस्तगत करण्यात आली आहेत. शक्तीसिंग सुरेशकुमार (31) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दभाशी गावाच्या बसस्टॅन्डजवळ संशयास्पदपणे फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना व बेकायदेशीरपणे बाळगलेल्या गावठी बनावटीच्या पिस्तूल आढळून आल्या. त्याच्याकडून चार पिस्टलसह प्रत्येकी 2 हजाराच्या 5 धातूच्या मॅगझीन आणि 5 हजार किमतीची काडतुसे असा एकूण 1 लाख 5 हजाराचा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. (15 pistols, 46 live cartridges, 5 fighters with 22 swords seized from local crime branch in Buldhana)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.