2 एकरावरील हरभऱ्याच्या गंजीला आग; जयप्रकाश यांच्या जीवनात अंधार

या आगीत तब्बल 25 क्विंटलच्या जवळपास हरभरा जळून खाक झाला आहे. त्यामुळे जाधव या शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे.

2 एकरावरील हरभऱ्याच्या गंजीला आग; जयप्रकाश यांच्या जीवनात अंधार
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 11:58 AM

बुलढाणा : जिल्ह्यातील निवाना येथील शेतकरी जयप्रकाश जाधव यांनी आपल्या 2 एकर शेतातील हरबरा काढून त्याची गंजी लावली होती. मात्र रात्रीच्या वेळी त्या हरभऱ्याच्या गंजीला आग लागली. आगीत संपूर्ण हरभरा जळून खाक झाला. ही आग अज्ञात व्यक्तीने आग लावली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आगीत तब्बल 25 क्विंटलच्या जवळपास हरभरा जळून खाक झाला आहे. त्यामुळे जाधव या शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. मोठ्या मेहनतीनं त्यांनी दोन एकर जागेत हरभरा लावला होता. त्याची जोपासना केली. हरभरा काढून गंजी लावून ठेवली. मशीनमध्ये चुरून हा हरभरा ते विक्रीसाठी नेणार होते. पण, आग लागल्याने हातातोंडाशी आलेला घास गेला.

यंदा हरभऱ्याला चांगला हमीभाव

सध्या बाजारात हरभरा साडेचार हजार प्रती क्विंटल या दरानं विकला जातो. हरभऱ्याला पाच हजार ३३५ रुपये हमीभाव दिला जात आहे. त्यामुळं नोंदणी केंद्रावर अमरावती जिल्ह्यात रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. चार पैसे जास्त मिळतील, हा त्यामागचा हेतू होता. रब्बी हंगामात हरभऱ्याच्या पिकाचं विक्रमी उत्पादन झालं. शेतकऱ्यांना याला फायदा होणार आहे. पण, जयप्रकाश यांच्याबाबतीत काही वेगळचं घडलं.

आगीत दोन एकरमधील हरभरा जळाला

यंदा २५ क्विंटल हरभरा झाल्याने सव्वा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पादन होणार म्हणून ते कालपर्यंत खूश होते. पण, काल अचानक हरभऱ्याच्या गंजीला आग लागली. त्या आगीत सर्वकाही जळून खाक झाले. त्यामुळं जयप्रकाश जाधव कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. या सव्वा लाखाच्या उत्पन्नातून आपण कसं खर्च करणार, याचे स्वप्न त्यांनी रंगवले होते. पण, आगीत संपूर्ण हरभरा जळून खाक झाल्याने त्यांचे स्वप्न अधुरेचं राहिले. इतर हरभरा उत्पादकांना उत्पन्न मिळाले. मात्र, आपण काय वाईट केलं होतं. आपलं नुकसान कुणी केलं, याचा विचार आता जयप्रकाश करत आहे. आग लावणाऱ्याला अटक करून त्याच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. तसेच आगीत हरभला जळाल्याने नुकसानभरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.