Buldhana Accident : बुलढाण्यात पुन्हा अपघात, दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक, सहा ठार

बुलढण्यात अपघात सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. समृद्धी महामार्गावरील बस जळीतकांडाच्या स्मृती ताज्या असतानाच पुन्हा एकदा बस अपघात घडला आहे.

Buldhana Accident : बुलढाण्यात पुन्हा अपघात, दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक, सहा ठार
बुलढाण्यात दोन बसच्या अपघातात 5 ठारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 12:01 PM

बुलढाणा / 29 जुलै 2023 : समृद्धी महामार्गावरील खाजगी ट्रॅव्हल्सच्या अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच आज पुन्हा एकदा अपघात झाला आहे. मलकापूर शहरातून जाणाऱ्या नागपूर मुंबई हायवे क्रमांक सहावर दोन ट्रॅव्हलची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. लक्ष्मीनगर उड्डान पुलावर घटना सकाळी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाल्याचे कळते. या धडकेत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, 22 प्रवासी जखमी झाले. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरु केले.

अपघातात बसचा चुराडा

तीर्थयात्रा करून एक ट्रॅव्हल्स अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तीर्थयात्री होते. तर दुसरी ट्रॅव्हल्स नागपूरहून नाशिकच्या दिशेने चालली होती. या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. यावेळी पहाटे 3 वाजता मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक सहावर दोन्ही बस समोरासमोर धडकल्या. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर धडकल्याने अक्षरशा त्यांचा चुराडा झाला.

पाच जणांचा जागीच मृत्यू, 25 जखमी

या भीषण अपघातत पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही ट्रॅव्हल्समधील एकूण 22 प्रवासी जखमी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.