Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

८० वर्षीय आजीबाई गजानन महाराजांच्या दर्शनाला आल्या; गर्दीत ट्रेनमध्ये चढू शकल्या नाही तेव्हा…

आता आपण घरी कसे जाणार, याची चिंता त्यांना लागली. तेवढ्यात आरपीएफ जवान त्यांच्या मदतीला धावून आले. त्यामुळे त्या परतीचा प्रवास करू शकल्या.

८० वर्षीय आजीबाई गजानन महाराजांच्या दर्शनाला आल्या; गर्दीत ट्रेनमध्ये चढू शकल्या नाही तेव्हा...
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 9:36 AM

बुलढाणा : प्रवास करताना कधीकधी काही गमतीजमती होत असतात. अशावेळी काही जण घाबरून जातात. कारण त्यांना प्रवासाबद्दल फारशी माहिती नसते. अशीच काहीशी घटना शेगावमध्ये घडली. चंद्रपूरच्या सयाबाई झांबरे या गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन झाले. परतीचा प्रवास करायचा होता. ट्रेनमध्ये गर्दी होती. सयाबाई यांना गर्दीत प्रवास करायची सवय नव्हती. त्यांच्यासोबतचे ट्रेनमध्ये बसले. ट्रेन सुरू झाली. सयाबाई खालीच राहिल्या. धावत्या ट्रेनमध्ये जा बसू शकत नव्हत्या. त्यामुळे सयाबाई प्रचंड घाबरल्या. आता आपण घरी कसे जाणार, याची चिंता त्यांना लागली. तेवढ्यात आरपीएफ जवान त्यांच्या मदतीला धावून आले. त्यामुळे त्या परतीचा प्रवास करू शकल्या.

आजी ट्रेनमध्ये चढू शकल्या नाही

चंद्रपूर येथील सयाबाई झांबरे ह्या 80 वर्षीय आजी आपल्या गावातील वृद्ध महिलांसोबत काल शेगावच्या गजानन महाराज यांच्या दर्शनाला आल्या होत्या. मात्र नवजीवन एक्स्प्रेसने परत जाताना ट्रेनमध्ये गर्दी असल्याने सयाबाई झांबरे यांना ट्रेन मध्ये चढताच आले नाही. ट्रेन निघून गेल्यावर आजी खालीच राहिल्या. यावेळी घाबरलेल्या अवस्थेत आजीने शेगाव स्टेशनवर ड्युटीवर असलेले आरपीएफ जवान रंजन तेलंग यांचा हात पकडून आजीने घडलेला प्रकार सांगितला.

कुटुंबीयांच्या स्वाधीन केले

यावेळी आरपीएफ जवान तेलंग यांनीही आजीला चहा, नाश्ता देऊन विचारपूस केली. वरिष्ठांच्या कानावर सर्व हकिकत टाकली आणि आजीला घरी पोहचवण्याचा निर्णय घेतला. एवढेच काय सर्व सूत्र हलले आणि आजीला ओखापुरी एक्स्प्रेसमध्ये आजीला बसून देत समोर त्यांच्या कुटुंबाशी बोलून त्यांना त्यांच्या ताब्यात दिले. अशाप्रकारे आजीला घरी पोहचवण्याचा आनंद आरपीएफ जवान रंजन तेलंग यांना तर झालाच शिवाय त्यांच सर्वत्र कौतुकही होत आहे.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.