काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पोहचल्या 93 वर्षीय लीलाबाई, 1942 च्या भारत छोडो आंदोलनातही सहभाग

9 ऑगस्ट 1942 ला त्या 12 वर्षांच्या होत्या. महात्मा गांधी यांनी करो या मरोचा नारा दिला होता.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पोहचल्या 93 वर्षीय लीलाबाई, 1942 च्या भारत छोडो आंदोलनातही सहभाग
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 8:33 PM

बुलढाणा : काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील या यात्रेत 93 वर्षीय लीलाबाई चितळे सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे लीलाबाई चितळे यांनी भारत छोडो यात्रेत सहभाग घेतला होता. लीलाबाई गुरुवारी बाळापूरजवळ भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. राहुल गांधींसह सर्व नेत्यांनी लीलाबाई यांचे फोटो शेअर केलेत.

राहुल गांधी यांनी ट्विट केलंय. 1942 च्या भारत छोडोपासून 2022 च्या भारत जोडोपर्यंत देशावर प्रेम करणारे संघर्षासाठी तयार आहेत. लीलाबाईजी, तुमचं कुटुंबाचं त्याग हे अमूल्य आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्य आणि संविधानासाठी संघर्ष करणार आहोत.

काँग्रेस नेता जयराम रमेश यांनी ट्वीट केलं. 93 वर्षीय लीलाबाई चितळे यांच्यासोबतची भेट प्रेरणादायी होती. त्यांनी 1942 च्या भारत छोटो आंदोलनात सहभाग घेतला होता. त्या बाळापूर येथील यात्रेत सहभागी झाल्या होत्या. संविधानाची सुरक्षा करणं आवश्यक आहे, असं त्यांना वाटते.

लीलाबाई या जेलमध्येही होत्या. लीलाबाई म्हणाल्या, 9 ऑगस्ट 1942 ला त्या 12 वर्षांच्या होत्या. महात्मा गांधी यांनी करो या मरोचा नारा दिला होता. त्या वयानं लहान असल्यानं त्यांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून देण्यात आले होते. परंतु, त्यांच्या वडील व भावाला अटक करण्यात आली होती. त्यांना साडेतीन वर्षांची शिक्षा झाली होती. अशी 1942 ची गोष्ट त्यांनी राहुल गांधी यांना सांगितली. जुन्या आठवणींना लीलाबाई यांनी उजाळा दिला.

लीलाबाई म्हणाल्या, मी माझ्या दोन मैत्रिणींनी कॉलेजसमोर नारे दिले होते. त्यामुळं आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले. संध्याकाळपर्यंत पोलीस चौकीत ठेवलं. पण, आम्ही १२ वर्षांच्या असल्यानं संध्याकाळी सोडून देण्यात आलं. स्वातंत्र्य काही सहज मिळालं नाही. त्यासाठी गरीब, श्रीमंतांनी सहकार्य केलं. सर्व धर्मचे लोकं महात्मा गांधी यांच्यासोबत होते.

मानवी शक्ती तयार झाल्यानं इंग्रजांना माघार घ्यावी लागली. इंग्रजांकडं सर्व आयुध होती. सर्व जण एकत्र आल्यानं इंग्रजांना परत जावं लागलं. जयराम रमेश यांच्यासारखे लोकं जे करत आहेत. ते खूप चांगलं आहे. उद्या मी कदाचित नसेन. पण, या माध्यमातून संविधानाची सुरक्षा केली जात असल्याचं त्या म्हणाल्या.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.