धावत्या ट्रेनमध्ये महिला चढत होती; पाय रेल्वे आणि प्लॅटफार्मच्या मधात पडला आणि…
रेल्वे हळूहळू सुरू झाली. काही प्रवासी बसत होते. एका कोचमध्ये बसण्यासाठी गर्दी होती. पाच-सहा लोकांना आतमध्ये बसायचे होते. एक-एक करून कोचमध्ये बसत होते.
बुलढाणा : रेल्वेतून प्रवास करत असताना सावधान राहणे आवश्यक आहे. अन्यथा अपघात होण्याची शक्यता असते. असाच एक अपघात शेगाव (Railway) रेल्वेस्थानकावर घडला. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी जीव मुठीत आला होता. आता आपला जीव जातो की, काय अशी परिस्थिती होती. पण, आरपीएफ जवानाच्या मदतीनं महिलेला सुखरुप वाजवण्यात आरपीएफला यश आलं. मात्र, यानंतर अशा दुर्घटना होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. अकोला ( Akola) येथील महिला रेल्वेने प्रवास करत होती. रेल्वे आली नि सुरू झाली. ती धावत्या रेल्वेत बसण्याचा प्रयत्न करत होती. पण, तिचा पाय रेल्वे आणि प्लॅटफार्मच्या मध्ये अडकला आणि तिची चांगलीच पंचाईत झाली.
नेमकं काय घडलं?
जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकावर गांधीधाम – विशाखापट्टनम रेल्वे जात होती. एक महिला प्रवासी आपल्या कुटुंबासोबत चालत्या गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र अचानक तिचा पाय घसरून ती महिला रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये गेलीय. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले आरपीएफ जवान भागवत सरकटे यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. महिलेला बाहेर ओढून मृत्यूच्या दाढेतून वाचवले. संगीता सुईवाल असे त्या महिलेचे नाव आहे. ही महिला अकोला येथील रहिवासी आहे. ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
सीसीटीव्हीत काय दिसते?
रेल्वे हळूहळू सुरू झाली. काही प्रवासी बसत होते. एका कोचमध्ये बसण्यासाठी गर्दी होती. पाच-सहा लोकांना आतमध्ये बसायचे होते. एक-एक करून कोचमध्ये बसत होते. तीन-चार जण आतमध्ये गेले. महिला मागे राहिली. तिला वाटलं रेल्वे हळूहळू शुरू आहे. पण, तोपर्यंत रेल्वेने वेग घेतला होता. तिला रेल्वेट्या वेगाने धावता आले नाही. त्यामुळे ती प्लॅटफार्म आणि रेल्वे यांच्या मधात पडली. ट्रेन सुरू होती. अशात आरपीएफचा जवान मदतीसाठी धावून गेला. सदर महिलेला व्यवस्थित गॅपमध्ये फसवून ठेवले. त्यानंतर हळूच बाहेर काढले. थोडीही गफलत झाली असती तर सदर महिला घटनास्थळीच चिरडली गेली असती.