बुलढाणा : शेगाव हे गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध असं ठिकाण आहे. शेगावात गजानन बाबा यांचं मोठं मंदिर आहे. शेकडो भक्त रोज येथे भेट देतात. गजानन बाबांचं दर्शन केल्यानं मनःशांती मिळते, असं भाविकांना वाटतं. गजानन बाबांचे दर्शन घेण्यासाठी आर्यन निखाडे या मुलाचं कुटुंब निघाले. रस्त्यात अपघात झाला. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळं आता आर्यनला गजानन बाबांचे दर्शन घेता येणार नाही. कारण या अपघाताने आर्यनला हिरावून घेतले आहे.
अल्टो कार आणि स्कार्पियो गाडीमध्ये मेहकर-जालना रोडवरील चिंचोली बोरे फाट्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात अल्टोमध्ये बसलेल्या १० वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झालेत. शेगावच्या संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी हे लोक शेगावला जात होते.
लोणार येथील रहिवासी असलेले गजानन निखाडे आपल्या कुटुंबीयासह काल सायंकाळी त्यांच्या अल्टो कारने संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघाले होते. घरून निघून अर्धातास होत नाही तोचं काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांची गाडी मेहकर-जालना मार्गावरील चिंचोली बोरे फाट्यावर पोहचताचं नागपूरकडून येत असलेल्या स्कार्पियोने अल्टोला धडक दिली.
या अपघातात अल्टोमधील आर्यन निखाडे वय १० वर्ष याचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. तर या घटनेत आर्यनच्या आईसह पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपण गजानन बाबांचे दर्शन घेऊ, अशी या कुटुंबीयांची इच्छा होती.
मात्र, या अपघातामुळे निखाडे कुटुंबीयांना रुग्णालयात भरती व्हावे लागले. त्यातच दहा वर्षांचा आर्यन गेला. त्यामुळे त्यांच्या दुःखाला पारावार उरला नाही. समोरून येणाऱ्या स्कार्पिओने अल्टोला उडवले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. पोलिसांना कळवण्यात आलं. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.