बी.ए.च्या विद्यार्थ्याचं होत आहे सर्वत्र कौतुक; कारण त्याने केली ही विशेष कामगिरी
शिक्षणाबरोबरच शेळी पालन करून स्वतःचा उद्योग आताच निर्माण केला. तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केलाय. नंदकिशोर माळी हा तरुण बी. ए. प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे.
बुलढाणा : शेळीला गरिबाची गाय म्हणून ओळखले जाते. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अजूनही शेतीवर अवलंबून आहे. घरी गायी म्हशी असल्या तरी लोकं शेळीपालन करतात. काही जणांच्या घरी गायी, म्हशी पोसणं शक्य नसलं, तर ते शेळीपालन करतात. हे शेळीपालन करणे त्यांच्या फायद्याचे आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे. पण, त्याचे व्यवसायिकरण करणे बऱ्याच जणांना जमत नाही. पण, बुलढाण्यातील युवकाने हे करून दाखवलं. तीन शेळ्यांपासून त्याने सुरुवात केली. तेव्हा तो दहाव्या वर्गात होता. शिक्षणासोबत घरचे कुटुंब चालवणं त्याला गरजेचे होते. त्यानंतर त्या शेळ्यांची संख्या त्याने वाढवली. सध्या त्याच्याकडे २० शेळ्या आहेत. त्यावर त्याचं कुटुंब चालतं. या छोट्याश्या युवकाने व्यवसायात प्रगती केली. इतर युवकांसाठी तो प्रेरणास्थान ठरत आहे.
एका शेळीची किंमत ५० हजार रुपये
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात झाडेगाव येते. झाडेगाव येथील परिक्षीत माळी या सुशिक्षित तरुणाने शिक्षणासोबत शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला. उस्मानाबादी जातीच्या तीन शेळ्यांपासून सुरु केलेला हा व्यवसाय आज रोजी २० शेळ्यापर्यंत पोहचला. आजच्या बाजारभावानुसार एका शेळीची किमत 15 हजार रुपये आहे. त्यानुसार त्याच्या शेळ्यांची किंमत ही आज लाखो रुपये झाली.
अर्ध बंदिस्त पद्धतीने शेळीपालन
शिक्षणाबरोबरच शेळी पालन करून स्वतःचा उद्योग आताच निर्माण केला. यामुळे तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केलाय. नंदकिशोर माळी हा तरुण बी. ए. प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. उस्मानाबादी शेळीपालनाचा हा व्यवसाय घरीच स्वतःच्या गोठ्यात अर्ध बंदिस्त पद्धतीने सुरु केलाय.
तरुणांना स्वयंरोजगाराकडे वळण्याचा सल्ला
शिक्षणासोबतच आपल्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून परीक्षितने हा शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला. त्यामधून त्याला दरमहा चांगले उत्पन्न मिळत आहे. त्याच्या या जिद्दीमुळे गावात त्याचे कौतुक होत आहे. इतर तरुणांनीसुद्धा यामधून आदर्श घ्यावा. नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराकडे वळावे, असा मोलाचा संदेश परिक्षीत माळी या तरुणाने दिलाय.