वडिलांच्या मृत्यूनंतर धाकटा मुलगा खचला, थोरल्यानं वाढदिवशी दिली अशी भेट की तो गहिवरलाचं
मोठ्या भावानं सुमीधला वडिलांचा सिलिकॉनपासूनचा तयार केलेला हुबेहुब पुतळा भेट दिला.
बुलडाणा : कोरोनात काळात कित्तेक कुटुंब उध्वस्त झाले. त्यात चिखली येथील शिक्षक दीपक विष्णू विनकर यांचाही जीव गेला. त्यांच्या मृत्यूनंतर दोन लहान मुलं पोरकी झाली. वडिलांच्या निधनाचा आघात लहान मुलावर जास्त झाला. लहान मुलगा सुमीध हा धक्का सहन करू शकला नाही. त्याची मानसिकता खचून गेली. सुमीधला शांत कसं करायचं कुणालाचं कळेना. कुटुंबीय त्रस्त झाले होते. वडील गेल्यानं त्याला आधारवड गेल्यासारखं वाटू लागलं. या धक्क्यातून तो सावरेल की नाही, कुटुंबीयांना काही कळत नव्हतं.
सुमीधच्या खराब मानसिकतेतून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण, त्याला मोठा भाऊ, आई, मामा यांना काही यश आले नाही. आता सुमीध दैनंदिन कामात कसा लागेल, याची चिंता घरच्यांना सतावू लागली.
येवढ्यात सुमीधचा वाढदिवस आला. वडिलांची कायम आठवण राहावी, यासाठी सुमीधला आगळीवेगळी भेटवस्तू देण्याचं ठरविण्यात आलं. मोठ्या भावानं सुमीधला वडिलांचा सिलिकॉनपासूनचा तयार केलेला हुबेहुब पुतळा भेट दिला.
वडिलांचा पुतळा पाहून सुमीध गहिवरला. त्याचे अश्रू अनावर झाले. मोठ्या बंधूनं जणूकाही त्याला वडीलचं परत मिळवून दिल्याचा आनंद झाला. त्यामुळं वाढदिवशी तो खूप खूश होता. आता सुमीध दैनंदिन काम सुरळीत करू लागला. वडिलांचा पुतळा त्याला प्रेरणा देतोय.
बंधुत्वप्रेम कसे असावे, याचे ज्वलंत उदाहरण शुभम आणि सुमीध या दोन भावांच्या प्रेमातून प्रगट झाले. सिलिकॉनचा बाबांचा पुतळा पाहून सुमीधच्या जीवनात बदल झाला. तो कुटुंबीयांत रमू लागला.