BULDHANA : गावातील दारु मटका बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिला सरपंचाचं कौतुक
महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींनी आतापर्यंत अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्याचपद्धतीने बुलढाणा जिल्ह्यात निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे कौतुक होत आहे.
गणेश सोळंकी, बुलढाणा : महाराष्ट्रात (Maharashtra) नव्याने स्थापण झालेल्या अनेक ग्रामपंचायतींनी (grampanchayat dicision) चांगले निर्णय घेतले आहेत. ज्या ग्रामपंचायतींनी चांगला निर्णय घेतला आहे, त्यांचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंबा ग्रामपंचायतीने (buldhana ruikhed mayamba grampanchayat) सुध्दा चांगला निर्णय घेतल्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा आहे. रुईखेड मायंबा ग्रामपंचायतीला महिला सरपंच आहेत, त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गावातील अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सरपंचांचं सगळीकडे कौतुक होत असून अनेकांनी चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरु असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तरुण मुले सुद्धा व्यसनाधीन होत चालली आहेत. मात्र रुईखेड मायंबा येथील ग्रामपंचायतीच्यावतीने काल विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेमध्ये गेल्या अनेक दिवसापासून रुईखेड मायांबा सह परिसरात सुरु असलेले वरली, मटकासह अवैध धंदे विरोधात ही ग्रामसभा घेण्यात आली.
ग्रामसभेत परिसरातील संपूर्ण अवैध बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी प्रशासनाला यासंदर्भात वेळोवेळी कळविले होते. मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केले. अखेर गावाच्या महिला सरपंच सुरेखा फेपाळे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून इतर ग्रामस्थांनी सुद्धा याला प्रतिसाद दिला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीची आदर्श अशी वाटचाल पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींनी आतापर्यंत अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्याचपद्धतीने बुलढाणा जिल्ह्यात निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे कौतुक होत आहे.