भाजप भाकड पक्ष, हा पक्ष आहे का चोरबाजार?; उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्ला

इथल्या गद्दारांना तुम्हीच आमदार आणि खासदार केलं. या ताईंना धमक्या दिल्या

भाजप भाकड पक्ष, हा पक्ष आहे का चोरबाजार?; उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्ला
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 5:54 PM

बुलडाणा – उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे आज सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. हा पक्ष आहे का चोरबाजार असा घणाघात त्यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले, मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. मी नव्या जोमाने आणि दमाने उभा आहे. काही केलं तरी मी पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच. गुवाहाटीला गेले. काय झाडी, काय डोंगार सगळं ओके. इथल्या गद्दारांना तुम्हीच आमदार आणि खासदार केलं. या ताईंना धमक्या दिल्या. मुंबईवरून दलाल पाठवले जायचे. त्यांच्यावरील आरोप वाचले जायचे. त्यांच्या आजूबाजूच्या दलालांना अटक केली.

पण ताई हुशार. ताईंनी थेट पंतप्रधानांना राखी बांधली. भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना… तो फोटो छापून आणला. सीबीआय आणि ईडीची हिंमत आहे का मग अटक करायला. ही चालूगिरी आपल्याला समजत नाही का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजप हा भाकड पक्ष झाला आहे. विचार संपले आहेत. नेते संपले आहेत. त्यांचे सर्व नेते आयात केलेले आहेत. हा आयात पक्ष आणि त्यांची दादागिरी सुरू आहे. या आयात पक्षाची दादागिरी मोडता येणार नाही का. हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

आपल्या छत्रपतींचा अपमान सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातच्या निवडणुकीसाठी गुजरातमध्ये वळले. का नेताय तर गुजरातच्या निवडणुका जिंकायच्या. कालपरवा बोम्मई बोंबललेत. त्यांनी सोलापूरवर हक्क सांगितला. अक्कलकोटवर हक्क सांगितला. पुढच्या वर्षी कर्नाटकाच्या निवडणुका आहे, असही ते म्हणाले.

मला भीती वाटते महाराष्ट्रात येणारे उद्योग त्यांनी गुजरातला नेले. तसेच महाराष्ट्रातील हे तुकडे करायला मागे पुढे पाहणार नाही. का तर कर्नाटकाच्या निवडणुका आहे, असंही त्यांनी म्हंटलं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.