Buldana : शेतजमिनीचा वादातून महिला-पुरुष लाठ्याकाठ्यांसह भिडले! बुलडाण्यात तुफान राडा

Buldana Crime : बुलडाण्याच्या देऊळघाट येथील पारवे कुटुंबावर शेजारील शेतमालकाने कुटुंबासह लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. यात पारवे कुटुंब मधील तिघे जण जखमी झाले

Buldana : शेतजमिनीचा वादातून महिला-पुरुष लाठ्याकाठ्यांसह भिडले! बुलडाण्यात तुफान राडा
तुफान राडाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 2:42 PM

बुलडाणा : शेतजमिनीच्या वादातून कुटुंबावर हल्ला (Buldana Crime News) करण्यात आलाय. पारवे कुटुंबाला लाठाकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी दोन्ही कुटुंबांत जोरदार राडा (Fight in two Families) झाल्याचं पाहायला मिळालं. 31 मे रोजी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झालाय. बुलडाण्याच्या देऊळघाट परिसरात हा सगळा प्रकार घडाय. अचानक लाठ्या काठ्यांनी काही महिला आणि पुरुष भिडल्यानं एकच गोंधळ देऊळघाट इथं उडाला होता. बाचाबाची आणि शिविगाळ करत यावेळी एकमेकांना मारहाण करण्यात आली. जीवघेण्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. एका कुटुंबाना दुसऱ्या कुटुंबाकडे शेत कसण्यासाठी मागितलं होतं. मात्र नकार देण्यात आल्यानं अखेर बळजबरीनं शेतावर ताबा मिळवण्याचा प्रकारातून हा वाद झाल्याचं समोर आलंय.

हल्ल्यात तिघे गंभीर जखमी

बुलडाण्याच्या देऊळघाट येथील पारवे कुटुंबावर शेजारील शेतमालकाने कुटुंबासह लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. यात पारवे कुटुंब मधील तिघे जण जखमी झाले . जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशय मीडियावर व्हायरल झालाय. मात्र शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

का झाला राडा?

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील रामराव पारवे यांचे कुटुंब हे बाहरेगावी राहत होते. त्यामुळे त्यांनी आपल्याकडील शेती शेजारील व्यक्तीला करायला दिली होती. मात्र आता गावाकडे आल्यावर पारवे यांनी आपली शेती त्यांना मागितली होती. पण त्यांनी देण्यास नकार दिला. तर बळजबरीने शेतीवर ताबा करून टाकला होता.

हे सुद्धा वाचा

मात्र रामराव पारवे यांनी आपली शेती असल्याने शेतात रहायला गेले. 31 मे रोजी सकाळी देऊळघाट येथील मुस्लिम कुटुंबाने रामराव पारवे यांच्या कुटुंबावर अचानक लाठ्या-काठ्यानी जीवघेणा हल्ला केलाय. यावेळी महिलांना देखील शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये कैद झालंय. या घटनेत पारवे कुटुंबातील तिघे जण जखमी झालेत. आता या संपूर्ण घटनेप्रकरणी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.