Buldana Accident: अपघाताचा फटका बसताच 12 म्हशींनी जागीच प्राण सोडला! ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात

Buldana Road Accident : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली- मेहकर रोडवरील मुंगसरी फाट्याजवळ मेहकर वरून चिखली कडे म्हशी घेऊन एक आयशर ट्रक जात होता. या आयशर ट्रकनं उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली.

Buldana Accident: अपघाताचा फटका बसताच 12 म्हशींनी जागीच प्राण सोडला! ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात
अकोल्यात ट्रॅकच्या धडकेने वृद्धाचा जागीच मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 5:53 PM

बुलढाणा : आयशर ट्रक आणि ट्रेलरच्या भीषण अपघात (Buldana Road Accident) झाला. या अपघातामध्ये तब्बल 12 म्हशी जागीच दगावल्या. या घटनेनं हळहळ व्यक्त होतेय. या अपघातात आयशर ट्रकचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रेलरमधील 16 पैकी 12 म्हशीच जागीच ठार (12 Buffalos killed) झाल्यात. तर 4 म्हशी या गंभीर जखमी आहेत. मुंगसरी फाट्यावर हा भीषण अपघात घडला. या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मेहकर रोडवरील (Chikhali Mehkar Road in Buladana) मुंगसरी फाट्यावर ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ लोकांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. तसंच रुग्णवाहिलेकाही पाचारण करण्यात आलं. यानंतर जखमींनी तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलंय. उभ्या ट्रेलरचा भरधाव आयशर टेम्पोनं धडक दिल्यामुळे हा अपघात घडला.

लोखंडी सळ्यांनी घात…

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली- मेहकर रोडवरील मुंगसरी फाट्याजवळ मेहकर वरून चिखली कडे म्हशी घेऊन एक आयशर ट्रक जात होता. या आयशर ट्रकनं उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. उभ्या असलेल्या ट्रेलरला धडक देता धडकी भरवणारा आवाज झाला. उभ्या असलेल्या ट्रेलरमध्ये लोखंडी सळई भरलेल्या होत्या. त्यामुळे या अपघाताची भीषणता अधिकच वाढली!

मार बसताक्षणी प्राण गेला!

या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर याच घटनेत 12 म्हशी मृत झाल्यात. चार म्हशी जखमी झाल्या असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत. अपघातावेळी झालेली धडक इतकी भयंकर होती, की गाडीमधील 12 म्हशींचा जोरदार मार बसून त्यांचा जागीच जीव गेला.

स्थानिकांचं बजावकार्य

या घटनेची माहिती मिळताच, जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ जखमींना बाहेर काढलं आणि उपचारासाठी रुग्णलयात पोहोचवलं. म्हशी घेऊन जाणारा ट्रक हा औरंगाबादला जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

इतर बातम्या :

उन्हाळा, उष्णता अन् भारनियमन; संतप्त नगरसेवकाकडून वीज वितरण कार्यालयाची तोडफोड

सांगलीत पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

महिलांवरती बलात्कार करण्याची उघडपणे धमकी, व्हिडीओच्या आधारे महंतांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

पाहा Video : महाराष्ट्रातील मोठी बातमी : एसटी कर्मचाऱ्यांचा संप पुन्हा चिघळला?

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.