आक्षेपार्ह पोस्ट टाकणे भाजप कार्यकर्त्याला भोवले, भाजप कार्यकर्ता रुग्णालयात; पोलीस बंदोबस्त वाढवला

आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून चिखलीत वाद झाला. भाजपच्या एका कार्यकर्त्याने काँग्रेसच्या नेत्याच्या निधनानंतर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यानंतर वाद झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले.

आक्षेपार्ह पोस्ट टाकणे भाजप कार्यकर्त्याला भोवले, भाजप कार्यकर्ता रुग्णालयात; पोलीस बंदोबस्त वाढवला
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 3:13 PM

बुलढाणा : आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून चिखलीत वाद झाला. भाजपच्या एका कार्यकर्त्याने काँग्रेसच्या नेत्याच्या निधनानंतर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यानंतर वाद झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. भाजप कार्यकर्ता या मारहाणीत जखमी झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिखलीत झालेल्या या राड्यामुळे तणावाचे वातावरण आहे. माजी आमदाराच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण ते समजून घेऊया.

आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट

जिल्ह्यातील चिखलीत आज सकाळी नागरिकांना तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. चिखलीतील श्री शिवाजी विद्यालयासमोर भाजपच्या श्याम वाकदकर यांना मारहाण करण्यात आली. ही मारहाण काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे आणि त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आली. माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या वडिलांच्या निधन झाले. त्यानंतर त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वाकदकर यांनी फेसबुकवर केली होती. त्यामुळेच हा प्रकार घडलाय.

हे सुद्धा वाचा

हे खपवून घेतले जाणार नाही

स्वतः राहुल बोंद्रे यांनीसुद्धा या वृत्ताला दुजोरा दिलाय. कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. हे खपवून घेतले जाणार नाही. आज थोडक्यात झाले. यानंतर परिणाम वाईट होतील. असा इशाराही माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिलाय. मारहाणीनंतर वाकदकर यांना बुलडाणा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन्ही गटांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. राहुल बोंद्रे यांच्या कार्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.

या वादामुळे चिखलीत काँग्रेस वर्सेस भाजप असा वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिखलीत पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. विशेष म्हणजे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या कार्यालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.

राहुल बोंद्रे हे माजी आमदार आहेत. त्यांच्या वडिलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ते चांगलेच संतापले. त्यांचे कार्यकर्तेही आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात झाले. त्यामुळे हे प्रकरण घडलं. आता थोडक्यात झालं. यानंतर कुणी अशी हिंमत केली, तर याहून जास्त शिक्षा मिळेल, असा इशाराचं त्यांनी दिला.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....