शेतकरी नेता लोकसभेच्या मैदानात, शिंदे गटाच्या बड्या नेत्याला थेट आव्हान; आज उमेवारी अर्ज दाखल करणार

Farmer Leader Ravikant Tupkar Will file nomination form Today : शेतकरी नेता लोकसभेच्या मैदानात; आज उमेवारी अर्ज दाखल करणार...भाजपच्या बड्या नेत्याला थेट आव्हान देणार आहे. लोकसभेच्या रिंगणात उतरलेला हा शेतकरी नेत कोण? कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार? वाचा सविस्तर...

शेतकरी नेता लोकसभेच्या मैदानात, शिंदे गटाच्या बड्या नेत्याला थेट आव्हान; आज उमेवारी अर्ज दाखल करणार
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 2:47 PM

शेतकरी नेता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. सलग तीन टर्म खासदार असलेले शिवसेने उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात रविकांत तुपकर यांनी दंड थोपटले आहेत. रविकांत तुपकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. विजय निश्चित आहे. लोक माझ्या पाठिशी आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी मी लढा देतोय. सामान्य शेतकऱ्यांचा मला पाठिंबा आगे, असं रविकांत तुपकर म्हणाले.

मोठ्या संख्येने नागरिक, तरुण, महिला अर्ज भरण्यासाठी येणार आहे. ही निवडणूक जनता विरुध्द नेता अशी असणार आहे. सामान्य जनता विरुध्द पांढऱ्या कपड्यातील नेता अशी निवडणूक होणार आहे. आमचा विजय निश्चित असणार आहे. तीन पक्ष एकत्रित आले तरी महायुतीचे उमेदवारांच्या गाडीत लोक बसत नाहीत, असं तुपकर म्हणाले.

महायुतीवर निशाणा

अनेक संघटना पाठिंब्यासाठी येतील. लढत ही फक्त महायुतीच्या उमेदवारामध्ये आणि माझ्यात होणार आहे. एका तरुणाने माझ्यासाठी त्याच्या बायकोचे मंगळसूत्र विकले. सोबतचा अनेक लोक वर्गणी देत आहेत. भूमिपुत्र गाडीवर लिहून होत नाही. आपण कामातून दाखवून द्यायचं असतं की मी भूमिपुत्र आहे म्हणून… भूमिपुत्र आहे म्हणता तर सोयाबीन प्रश्र्नांवर किती बोलले तुम्ही?, असा सवाल रविकांत तुपकरांनी केला आहे.

जाधव यांच्यावर टीकास्त्र

ज्या ठाकरे परिवाराने त्यांना भक्कम दिले. त्यांचे झाले नाही तर सामान्य जनतेच काय होणार? महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरीचा फायदा निश्चित होणार आहे. भाजपमध्ये नाराजी आहे. काल माजी आमदार यांनी अर्ज भरला. बुलढाणा जिल्ह्यात महायुती मध्ये अलबेल नाही. दोन्ही पक्षात धुसफूस आहे, असं म्हणत तुपकर यांनी प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीवर भाष्य केलं.

अर्ज भरण्यासाठी शेतकरी बुलढाण्यात दाखल

रविकांत तुपकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंढरपूरवरून शेतकरी बांधव आले आहेत. रविकांत तुपकर यांचा अर्ज भरण्यासाठी पंढरपूर सह इतर जिल्ह्यातून शेतकरी जिल्ह्यात दाखल झालेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना तुपकरांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं. रविकांत तुपकर म्हणजे शेतकऱ्यांसाठी पांडुरंग… जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नेत्याला दिल्लीला पाठवावं. इथल्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही.आज आम्ही शेतकरी तुपकर साठी झगडणार आहोत. शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. शेतकरी नेता दिल्लीला पाठवयाला पाहिजे, असं शेतकरी बांधव म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.