‘शासन आपल्या दारी कर्मचारी मात्र स्वतःच्याच घरी’, व्हायरल बॅनरवरची ऑफर पाहून लोकांना हसू आवरेना

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव काही तरुणांनी बॅनर लावले आहेत. ते बॅनर सध्या तालुक्यात चर्चेचे ठरत आहेत. व्हायरल बॅनरवरची ऑफर पाहून लोकांना हसू आवरेना अशी स्थिती निर्माण झाली आहे.

'शासन आपल्या दारी कर्मचारी मात्र स्वतःच्याच घरी', व्हायरल बॅनरवरची ऑफर पाहून लोकांना हसू आवरेना
buldhana khamgaon viral bannerImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 2:21 PM

खामगाव : सध्या केंद्र व राज्य सरकारच्या (Central government yojana) योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या जाव्या यासाठी सरकारकडून एक अभियान राबवलं जात आहे. या अभियानाचं नाव ‘शासन आपल्या दारी’ (shasan aapalya dari) असं आहे. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव (buldhana khamgaon viral banner) तालुक्यातील बोरी अडगावमध्ये ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक फिरत नसल्यामुळे तरुणांनी बॅनर लावले आहेत. त्या बॅनरची संपूर्ण तालुक्याच चर्चा सुरु आहे. त्या बॅनरवरती ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक दाखवा ११ रुपये बक्षीस जिंका अशी ऑफर गावातल्या लोकांना दिली आहे.

सुशासन चालवता यावे यासाठी…

‘छत्रपती शाहू महाराज यांनी लोककल्याणकारी शासन त्यावेळी सगळ्या घटकांना घेऊन चालवले होते. विशेष म्हणजे त्यांच्या जयंतीदिनी या सरकारला देखील सुशासन चालवता यावे यासाठी बोरी अडगाव येथील सुशिक्षित तरुणांनी गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक दाखवा आणि अकरा रुपये मिळवा असे अभियान सुरू केले आहे अशी माहिती सुशिक्षित तरुण, राहुल सुरवाडे याने दिली.

हे सुद्धा वाचा

शासन आपल्या दारी कर्मचारी मात्र स्वतःच्याच घरी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या जाव्या यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. परंतु काही गावांमध्ये ग्रामसेवक, तलाठी फिरकत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. बोरी अडगावमधील तरुणांनी अधिकाऱ्यांची चांगलीचं फजिती केली. गावात महत्त्वाच्या ठिकाणी लावलेले बॅनर सगळ्याचं लक्ष खेचत आहेत. बाहेरच्या गावातील आलेली लोकं बॅनर वाचत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावर सुध्दा बॅनर व्हायरल झाले आहेत. “शासन आपल्या दारी कर्मचारी मात्र स्वतःच्याच घरी”, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक दाखवा आणि अकरा रुपये मिळवा असा आशय बॅनरवरती लिहीला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.