गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील नागणगाव (Nagangaon) ग्रामपंचायतचा तुघलकी कारभार उजेडात आला असून ज्या चिमुकल्यांसाठी शासनाने अंगणवाडीचे बांधकाम केले, त्याच अंगणवाडीच्या इमारतीत ग्रामपंचायत चालवणाऱ्या चालवली जात असल्याचं स्पष्ट झालंय. हा प्रकार मागील सात ते आठ महिन्यांपासून सुरू असून अंगणवाडीत जाणारे चिमुकले , मात्र कधी शाळेच्या बाहेर व्हरांड्यात तर कधी दुसऱ्या अंगणवाडीत बसवले जात असल्याची माहिती तिथल्या स्थानिकांनी सांगितली आहे. वर्गात एकूण ६० विद्यार्थी असल्यामुळे विद्यार्थ्यांना (student) बसायला जागा नीट पुरत नाही.
ग्रामपंचायतीचा कारभार अंगणवाडी चालत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. एकाच वर्गात ६० विद्यार्थी असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. हा सगळा प्रकार तिथल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या मर्जीनुसार सुरु आहे. अंगणवाडीत ग्रामपंचायत कशी काय सुरु केली असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तक्रार केल्यानंतर ग्रामसेवक पुढच्या कामाला देईल यामुळे नागरिक तक्रार करण्यास घाबरत आहेत.
याविषयी ग्रामसेवकांना विचारणा केली असता, ग्रामसेवक म्हणतात की, “आम्ही या खोलीचा वापर फक्त बसण्यासाठी करतो, मात्र कारभार करत नाही, आणि बाहेर नावही अंगणवाडी लिहिले आहे. मात्र ग्रामपंचायतचे सर्व साहित्य, संगणक, खुर्ची टेबल, कपाट, सर्वकाही , ऑनलाईन कामे सुद्धा अंगणवाडीत आहे.” अशी माहिती गजानन बोडखे, ग्रामसेवक, नागणगाव यांनी दिली.आता यावर कारवाई कोण करणार आणि चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी कोण घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीची मदत केली जात आहे. त्याचबरोबर चांगलं शिक्षण मिळावं यासाठी वेगवेगळ्या योजनाचं आयोजन केलं जात आहे. परंतु सध्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे गावकरी चिंतेत आहेत.